जैन सोशल ग्रुपचा वर्ष २०२३/२४ चा पद्ग्रहण सोहळा संपन्न.
संग्रामनगर ( बारामती झटका केदार लोहकरे यांजकडून)
अकलूज येथे जैन सोशल ग्रुपचा २०२३-२४ चा पदग्रहण समारंभ संपन्न झाला आहे त्यामध्ये गौतम गांधी यांची अध्यक्षपदी तर विरेन गांधी यांची सेक्रेटरीपदी निवड झाली आहे.या निवडी उन्मेषभाई कर्णावत (अध्यक्ष,महाराष्ट्र रिजन),राजेशभाई संघवी (खजिनदार,महाराष्ट्र रिजन), सुनिल लोढा (झोनल काॅर्डिनेटर, सोलापूर)यांच्या उपस्थितीत पार पडल्या.
जैन सोशल ग्रुप ही संस्था राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असून या संसथेच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक कार्यास मदत करत असतात.या संस्थे मार्फत रक्तदान शिबीर,वृक्षारोपण,आरोग्य तपासणी,गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप असे सामाजिक उपक्रम राबवित आसतात.तसेच सर्व जैन समाज बांधव एकत्र आणण्याचे काम ही संस्था करत असते.
या कार्यक्रमात अध्यक्षपदी गौतमभाई गांधी,सेक्रेटरीपदी विरेन गांधी,खजिनदार पदी प्रगणेश व्होरा,सह खजिनदार पदी अमोल वैद्य,उपाध्यक्ष पदी डॉ.बाहुबली दोशी व अमेय व्होरा संचालक म्हणून गौरव फडे,राहुल व्होरा,महाधवल गांधी,शीतल व्होरा,स्वराज फडे,डॉ.संकेत दोशी,आनंद देसाई,अनवीत गांधी व मयूर फडे यांची निवड झाली.
तसेच सीए इन्स्टिट्युट,दिल्लीच्या वेस्टर्न रिजनलच्या कमिटीवर सीए.शशील नंदकुमार गांधी-अकलूज (पर्सनल डेव्हलपमेंट कमेटी) सीए.अमीत सुकुमार दोशी-माळशिरस
(पब्लिक ॲड गव्हरमेंट फायनासील मॅनेजमेंट कमेटी) या पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
सर्वांचे स्वागत माजी सचिव राहुल व्होरा यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष गौरव फडे यांनी केले.या वेळी माजी अध्यक्ष शीतल भाई व्होरा यांनी मनोगत व्यक्त केले व झालेल्या कार्यचा आढावा दिला.गौतम गांधी यांनी या वर्षी होणाऱ्या कार्याची माहिती दिली.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव विरेन गांधी यांनी मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng