सोलापूर जिल्हा सहकारी बोर्डाच्या संचालकपदी माळशिरस तालुक्यामधून अरविंद पांढरे यांची बिनविरोध निवड

नातेपुते (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेड सोलापूर नूतन संचालक मंडळाची सभा सौ. एस. आर. वर्देकर निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेड सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथील मुख्याध्यापक भवन सभागृहात पार पडली. सोलापूर जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेड सोलापूर यांची नूतन संचालक मंडळ सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यामध्ये जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेड सोलापूर सन २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीसाठी संचालक मंडळाची यादी सोलापूर जिल्हा सहकार बोर्ड निवडणूक अधिकारी सौ. एस. आर. वर्देकर यांनी जाहीर केले. यामध्ये सोलापूर जिल्हा सहकारी बोर्डचे नूतन अध्यक्ष म्हणून प्रा. विलास लेंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष म्हणून मल्लिनाथ बगले पाटील यांची निवड करण्यात आली.
सोलापूर जिल्हा सहकारी बोर्ड याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून एक एक संचालकाची निवड केली जाते. यामध्ये माळशिरस तालुक्यातून अरविंद मधुकर पांढरे यांची बिनविरोध संचालक पदी निवड करण्यात आली.
मधुकर बापू पांढरे यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव आहेत. मधुकर पांढरे दादा यांनी नातेपुते गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्था, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच त्यांचे जेष्ठ चिरंजीव अरविंद मधुकर पांढरे हे सध्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, विविध सहकारी संस्थेमध्ये ते कार्यरत आहेत. त्यांची आता सोलापूर जिल्हा सहकारी बोर्ड माळशिरस तालुक्यामधून संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी नातेपुते गावचे नगरसेवक रावसाहेब भीमराव पांढरे, बाळासाहेब काळे, धुळदेवचे व्हा. चेअरमन संजय पाटील, धुळदेवचे संचालक राजेंद्र काळे, शिवाजी अर्जुन, वैभव काळे, तसेच दादासाहेब वाघमोडे, रमेश काळे, नामदेव पांढरे, रामचंद्र पांढरे, विशाल पांढरे, अमर देवकाते, गणेश काळे, अण्णा काळे आदी उपस्थित होते.
नूतन संचालक मंडळ मानसिंगराव साठे, सुरेखा लांबतुरे, अरविंद पांढरे, अशोक लेंडवे, गजेंद्र कोळेकर, अंबादास बिराजदार, दिलीप चौगुले, समीर शेख, अनिल चोपडे, प्रकाश आरे, शहाजी साठे, जयश्री साठे, रतन माने, सुहास पोतदार, भारत शिंदे या सर्व संचालकांचा उपस्थित मान्यवरांकडून शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा सहकार बॉडीचे अनेक सदस्य उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विलास लेंगरे यांनी केले तर, सूत्रसंचालन प्रा. वृंदा कुलकर्णी यांनी केले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng