ताज्या बातम्याराजकारण

भाजपच्या सोलापूर जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब केदार सावंत यांची निवड…

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे निष्ठावान व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे समर्थक आहेत.

सांगोला (बारामती झटका)

सांगोला नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व भाजपचे सांगोला तालुका अध्यक्ष श्री. चेतन उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांची भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेली आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये अनेक वर्षापासून महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे निष्ठावान व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे खंदे समर्थक असणारे श्री. चेतन उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांच्याकडे भाजपचे सांगोला विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रमुख जबाबदारी दिलेली आहे. ते सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर दूरसंचार विभागाच्या निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती केलेली आहे.

सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन लोकसभा मतदार संघ येत आहेत. त्यामध्ये माढा लोकसभा मतदार संघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला, करमाळा व माढा अशा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाने सोलापूर ग्रामीणसाठी दोन जिल्हाध्यक्ष व शहरासाठी एक शहराध्यक्ष अशी नेमणूक केलेली आहे. सोलापूर जिल्हाध्यक्ष व अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे सोलापूर मतदारसंघातील तालुक्यांची जबाबदारी व श्री. चेतन उर्फ बाळासाहेब केदार सावंत यांच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने दिलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button