ताज्या बातम्या

मळोली येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्राचे आयोजन

प्रसिद्ध व्याख्याते प्रमोदजी भापकर बारामती यांच्या व्याख्यानाचे आयोजन

मळोली (बारामती झटका)

मळोली, ता. माळशिरस येथे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य, मळोली यांच्या वतीने भव्य अखंड हरिनाम सप्ताह व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चरित्र चे आयोजन शुक्रवार दि. २१/०७/२०२३ ते गुरुवार दि. २७/०७/२०२३ या कालावधीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रांगण, मळोली येथे करण्यात आले आहे‌. या कालावधीत सायंकाळी ५ ते ६.३० यावेळेत श्री. प्रमोदजी भापकर, बारामती, निवृत्त कार्यकारी अभियंता महाजनको यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि. २१/०७/२०२३ रोजी सकाळी ७ ते ११ या वेळेमध्ये भव्य व दिव्य प्रमाणात दिंडी नगर प्रदक्षिणा होणार आहे. सप्ताहामध्ये शुक्रवार दि. २१/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये भव्य दिव्य दिंडी ग्रामप्रदक्षिणा होणार असून सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन होणार आहे. शनिवार दि. २२/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत बालकिर्तनकार ह.भ.प. सार्थक महाराज गायकवाड, ज्ञानाई गुरुकुल अकलूज यांचे कीर्तन होणार असून सायंकाळी ७ ते ९ वारकरीरत्न ह. भ. प. श्रावण महाराज अहिरे मालेगाव, नाशिक यांचे कीर्तन होणार आहे. रविवार दि. २३/७/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली महाराज झोळ, वाशिंबे यांचे कीर्तन होणार आहे तर सायंकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी कंठभूषण ह. भ. प. केशव महाराज मुळीक, बारामती यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार दि. २४/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ ह. भ. प. हनुमंत महाराज निकम तोंडले यांचे कीर्तन होणार आहे तर, सायंकाळी ७ ते ९ रामायणाचार्य ह. भ. प. नामदेव महाराज लबडे, पंढरपूर यांचे कीर्तन होणार आहे. मंगळवार दि. २५/०७/२०२३रोजी सकाळी १० ते १२ ह. भ. प. एकनाथ महाराज माने, भाळवणी यांचे कीर्तन होणार आहे तर सायंकाळी ७ ते ९ वारकरी भूषण ह. भ. प. उमेश महाराज दशरथे, मानवत, परभणी यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार दि.२६/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ ह. भ. प. दादासाहेब महाराज नरळे, म्हसवड यांचे कीर्तन होणार आहे तर सायंकाळी ७ ते ९ वारकरीरत्न ह. भ‌. प. अनिल महाराज पाटील बाभूळगाव, बार्शी यांचे कीर्तन होणार आहे. गुरुवार दि. २७/०७/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ ह. भ. प. माऊली महाराज पवार, खेड भाळवणी यांचे कीर्तन होणार आहे तर सायंकाळी ७ ते ९ ज्ञानाई गुरुकुल अकलूजचे संस्थापक ह. भ. प. सुरेश महाराज सूळ यांचे कीर्तन होणार आहे. तसेच शुक्रवार दि. २८/०७/२०२३ रोजी सकाळी ९ ते ११ ह. भ. प सोहम महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

दि. २७/०७/२०२३ रोजी ह. भ. प. विवेक देशमाने आणि परिवार माळीनगर यांचा संगीत भजनाचा कार्यक्रम दुपारी १२ ते ४ या वेळेमध्ये होणार आहे. समस्त ग्रामस्थ मळोली यांच्या वतीने काल्याचा महाप्रसाद होईल. या सप्ताहासाठी जगद्गुरु तुकोबाराय यांचे वंशज श्रीगुरु हरिभक्त परायण मधुसूदन ज्ञानेश्वर मोरे देहूकर महाराज यांचे आशीर्वाद असणार आहेत.

तरी, मळोली पंचक्रोशीतील भाविकांनी या सप्ताहातील कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button