आरोग्यताज्या बातम्या

चिकलठाण येथे राजेंद्र बारकुंड मित्र मंडळातर्फे भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर

करमाळा (बारामती झटका)

चिखलठाण ता. करमाळा, येथे शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्यावतीने भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दि. २९/०७/२०२३ रोजी सकाळी ९.३० वा. श्रीनाथ मंगल कार्यालय चिखलठाण नं. १, ता. करमाळा येथे करण्यात आले असून या शिबिरात सर्व रुग्णांची तपासणी करून मोफत औषधे व चष्म्याची वाटप केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, जिल्हा दूध संघ माजी उपाध्यक्ष विकासराव गलांडे यांनी दिली आहे.

सदर शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. तर यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे, करमाळ्याचे डी वाय एस पी अजित पाटील, करमाळ्याचे नायब तहसीलदार विजय जाधव, करमाळा पोलीस स्टेशनचे पीआय ज्योतीराम गुंजवटे, तालुका कृषी अधिकारी वाकडे साहेब, करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग, करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वामन उबाळे साहेब, जेऊरचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता भोयर साहेब आदींसह तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यालयीन अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरासाठी नगर, पुणे, सोलापूर येथील प्रतिष्ठीत हॉस्पिटलचे डॉक्टर रुग्ण तपासण्यासाठी येणार आहेत. या शिबिरामध्ये चिकलठाण परिसरातील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे.

तरी जास्तीत जास्त रुग्णांनी या भव्य मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, चिकलठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन विकास गलांडे, जाणता राजा मित्र मंडळ, विविध कार्यकारी सेवा सोसायटी व समस्त ग्रामस्थ चिकलठाण यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button