लवंग येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यांनी डॉ. ए. पी. जे. कलाम यांना अभिवादन केले.

अकलूज (बारामती झटका)
भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा आठवा स्मृतिदिन लवंग २५/४ येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्या मुलांनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांना आदरांजली वाहून साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. युवराज सोलणकर, पालक संघाचे अध्यक्ष सागर भोळे, उपाध्यक्ष रुपाली मिटकल, स्कूलच्या संचालिका नूरजहाँ शेख यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करीत पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौ. नूरजहाँ फकृद्दीन शेख म्हणाल्या की, डॉ. कलाम यांनी आपल्या देशाला वैज्ञानिक क्षेत्रात जगभरात आदराचे स्थान मिळवून दिले आहे. घरची परिस्थिती गरिबीची व अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी शिक्षण सोडले नाही. शिक्षणास सदैव महत्व दिले आणि आपल्या प्रखर बुद्धिमत्तेने दिवसरात्र मेहनत घेऊन अग्नी क्षेपणास्त्र बनवून देशाची प्रतिमा जगभरात उंचावली. स्वप्न झोपेत नाही जागेपणी पहा, अशी स्वप्न पहा जी तुम्हाला झोपु देणार नाहीत, आणि स्वप्न पूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील रहा, असे त्यांचे प्रेरक विचार सदैव प्रेरणा देत राहतील. या प्रसंगी गुलशन नशीब शेख यांनी उपस्थिताचे आभार मानले.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng