राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या राजकीय सेवानिवृत्ती संकल्पनंतर युवा नेते संकल्प डोळस राष्ट्रवादीचा नवा चेहरा असणार.

माळशिरस (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक व राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये राजकीय सेवानिवृत्ती घेण्याचा संकल्प केलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते संकल्प डोळस राष्ट्रवादीचे उमेदवार असणार अशी चर्चा राष्ट्रवादीत सुरू झालेली असल्याने संकल्प डोळस राष्ट्रवादीचा नवा चेहरा असणार अशी चर्चा माळशिरस तालुक्यात रंगलेली आहे.
माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील व मोहिते पाटील विरोध असे दोन राजकीय गट आहेत. मोहिते पाटील विरोधी गटाचे प्रमुख म्हणून गेली पंधरा वर्षे उत्तमराव जानकर माळशिरस तालुक्यात कार्यरत आहेत. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार हनुमंतराव डोळस व भाजपचे विद्यमान आमदार राम सातपुते यांच्या विरोधामध्ये उत्तमराव जानकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवलेली होती. विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागलेले होते.
माळशिरस तालुक्याच्या राजकारणात उत्तमराव जानकर यांच्या विचारांचा मोठा वर्ग आहे. माळशिरस तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषद, पंचायत समिती व गावांमध्ये ग्रामपंचायत, सोसायटी अशा निवडणुकांमध्ये उत्तमराव जानकर यांचे समर्थक विविध ठिकाणी निवडणूक लढवून विजयी झालेले आहेत.

उत्तमराव जानकर यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गटाला मोठे आव्हान उभे केलेले होते. त्यामध्ये ग्रामपंचायत मतदार संघातून उत्तमराव जानकर यांना माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी निवडून दिलेले आहे. विधानसभेची निवडणूक दीड वर्षावर आलेली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन-चार महिन्यांमध्ये सुरू होतील, असे असताना उत्तमराव जानकर यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात राजकीय सेवानिवृत्ती घेण्याचा संकल्प केलेला आहे.
राष्ट्रवादीचे स्वर्गीय आमदार हनुमंतराव डोळस यांनी माळशिरस विधानसभेचे प्रतिनिधित्व दोन वेळेला केलेले आहे. त्यांनी माळशिरस तालुक्याच्या सर्वसामान्य जनता व मतदार यांचे प्रश्न सोडविलेले होते. त्यांचे अकाली दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र संकल्प डोळस यांचे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व संसदपटू सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संकल्प डोळस यांच्याकडे महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस पदाची जबाबदारी देऊन सातारा जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी दिलेली होती. संकल्प डोळस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांची जाण आहे. स्वर्गीय आ. हनुमंतराव डोळस यांच्यासोबत विधान भवन मंत्रालयात कामानिमित्त भेटीगाठी व कार्य करण्याचा अनुभव आहे. माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या राजकीय सेवानिवृत्तीनंतर युवा नेते संकल्प डोळस हे भविष्यात राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते व कार्यकर्ते यांचा सूर आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng