मोदी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; मतदानासाठी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून व्हीप
दिल्ली (बारामती झटका)
लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे, विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावावर मतदान होणार आहे. दरम्यान, या मतदानासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्या खासदारांसाठी व्हीप काढण्यात आला आहे. अजितदादा पवार गटाकडून खासदार सुनिल तटकरे यांनी तर शरदचंद्रजी पवार यांच्या गटाकडून मोहम्मद फझल यांनी व्हीप जारी केला आहे.
अविश्वास प्रस्तावार दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे, आज या प्रस्तावावर मतदान होणार आहे. शरदचंद्रजी पवार यांच्या गटाकडून खासदार मोहम्मद फैजल यांनी व्हीप बजावला आहे. शरदचंद्रजी पवार यांच्या गटात लोकसभेत सप्रियाताई सुळे, अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, मोहम्मद फजल हे सदस्य आहेत. तर अजितदादा पवार यांच्या गटात सुनिल तटकरे हे एकच सदस्य आहेत. तटकरे यांनी काढलेल्या व्हीपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने मतदान करण्याची सूचना देण्यात आली आहे. शरदचंद्रजी पवार यांच्या गटाकडून काढलेल्या व्हीपमध्ये मोदी सरकार विरोधात मतदान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आता लोकसभा अध्यक्ष कोणत्या गटाचा व्हीप अधिकृत असल्याची मान्यता देतात, यावर सर्व अवलंबून आहे. आता हे दोन गट एकमेकांच्या विरोधात असल्याचे दिसत आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादीतील अजितदादा पवार यांच्यासह आठ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याचे दिसत आहे. यानंतर अजितदादा पवार यांनी निवडणूक आयोगात पक्षावर दावा केला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाने दाखल केलेल्या दाव्यानंतर केंद्रीय निवडणूूक आयोगाने पाठवलेल्या नोटीसला शरदचंद्रजी पवार गटाने उत्तर दिले आहे. राष्ट्रवादीमध्ये दोन गट नाहीत. शरदचंद्रजी पवारच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे अजितदादा पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा करणे, हे चुकीचे असल्याचे शरदचंद्रजी पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.
अजितदादा पवारांच्या याचिकेतून राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. राष्ट्रवादीत कुठला वाद आहे, हे सिद्ध करण्यास ते प्राथमिकदृष्ट्या सक्षम नाहीत. प्रथम दर्शनी निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वातील पक्षात आणि अजितदादा पवार गटात वाद असल्याचे सिद्ध केले नाही. दि. १ जुलै २०२३ च्या आधी अजितदादा पवारांनी शरदचंद्रजी पवारांविरोधात कुठली तक्रार दिली नव्हती. राष्ट्रवादीच्या कुठल्याही बैठकीत त्यांनी पवारांना विरोध केला नव्हता, असे शरदचंद्रजी पवार गटाने या उत्तरात म्हटले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Elliott Drake
I appreciate the humor in your analysis! For those interested, here’s more: FIND OUT MORE. What do you think?