आरोग्यदूत आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नाने स्पर्धेच्या युगात सरगरवाडी शाळेतील मुलांना मिळणार डिजिटल शिक्षण – बाळासाहेब सरगर, जिल्हाध्यक्ष

इंटरॅक्टिव बोर्डाच्या माध्यमातून मुलांना चित्रफितीसह ध्वनीने शिकता येणार…
कन्हेर (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याचे आरोग्यदूत लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून नाविन्यपूर्ण योजनेतून सरगरवाडी (कण्हेर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला साडेपाच लाख रुपयांचे साहित्य दिल्याने ग्रामीण भागातील शाळा डिजिटल झाली आहे. यामध्ये पाच बाय सहा फूट लांबीचा डिजिटल बोर्ड, पीसी, साऊंड सिस्टिम, कीबोर्ड, माऊस आदी साहित्य देण्यात आले. या इंटरॅक्टिव बोर्डामध्ये पाचवी ते सातवी पर्यंतचा अभ्यासक्रम डाऊनलोड केलेला आहे. त्यामुळे मुलांना चित्रफितीसह ध्वनीने शिकता येणार आहे. या इंटरॅक्टिव्ह बोर्डचे उद्घाटन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांचे शुभ हस्ते १५ ऑगस्ट च्या शुभमुहूर्तावरती करण्यात आले.
यावेळी जि. प. शाळेचे मुख्याध्यापक संजय राठोड, सहशिक्षक हरिदास चौरे, अंगणवाडी सेविका बाळूबाई धाईंजे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



तसेच मधुकर धाईंजे, अशोक शेंडगे व शाळा समितीचे उपाध्यक्ष शंकर सरगर यांचे हस्ते श्रीफळ फोडून सुरुवात करण्यात आली. यावेळी शाळा समिती अध्यक्ष काळे व वनिता पिंजारी यांचे शुभ हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संतोष शेंडगे, प्रताप शेंडगे, विलास शेंडगे, सुनील पिंजारी, शिवाजी सरगर, सतीश काळे, अंकुश शेंडगे, रामदास काळे, बबन शेंडगे, गोरख शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng