सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त पोस्टर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातारा (बारामती झटका)
सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळण्यासाठी स्वातंत्र्य सेनानींचे योगदान याविषयी मार्गदर्शनपर भाषण केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (+2 स्तर) ज्युनिअर विभागाच्यावतीने महाविद्यालयात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर साहेब यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी शहीद भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, सुशासनाची मूल्ये, जल-जीवन संवर्धन, भारतीय संसद, नवीन शैक्षणिक धोरण, चंद्रयान – ३, वसुंधरा संरक्षण, पर्यावरण वाचवा, शाश्वत विकासाचे ध्येय, भारताचे गरिबी निर्मूलनाचे कार्यक्रम इ. पोस्टर तयार केली होती.


या स्पर्धेतील विशेष लक्षणीय बाब म्हणजे मंदार महेश लोहार यांनी तयार केलेलं छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे शिल्प स्पर्धेचे आकर्षण ठरले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टरमध्ये अमेय संजय देशमाने याने प्रथम क्रमांक, मंदार लोहार याने द्वितीय क्रमांक तर सृष्टी शेंडगे हिने तृतीय क्रमांक मिळविला. प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सिनियर विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, डॉ. रामराजे माने देशमुख, डॉ. रोशनआरा शेख मॅडम, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे, ज्युनिअर विभागाच्या पर्यवेक्षिका प्रा. सौ. आसावरी शिंदे मॅडम, संस्थेचे लाईफ मेंबर बोर्डाचे सचिव प्रा. संदीप भुजबळ, सातारा जिल्हा समन्वयक प्रा. अरविंद जगताप, कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश लोहार, प्रा. विक्रम निकाळजे, कार्यालयीन अधीक्षक तानाजीराव सपकाळ तसेच शिक्षक शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng