संगम येथे वीज वितरण रोहित्राचे भूमिपूजन युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या शुभहस्ते होणार संपन्न

संगम (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा नियोजन समिती जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या फंडातून मंजूर झालेल्या संगम ता. माळशिरस येथील वीज वीज वितरण रोहित्राचे भूमिपूजन ऑल इंडिया युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी उदय भानू चिंब यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल नितीन राऊत यांच्या शुभहस्ते तसेच सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सुनंजय विजयसिंह पवार ,उपाध्यक्ष- शिवराज मोरे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत मंगळवार दि. २२ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२.५५ वाजता संपन्न होणार आहे.
याप्रसंगी माजी सरपंच लालासो पराडे पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटी संगमचे सदस्य शिवाजी इंगळे, विविध कार्यकारी सेवा सोसायटी संगमचे सदस्य भारत पराडे पाटील, विविध कार्यकारी सेवा सोसायटी संगमचे माजी चेअरमन बाळासो महाडिक, संगमचे माजी सरपंच महेश इंगळे, शिवसेना माळशिरस तालुका माजी उपाध्यक्ष आबासो गाडेकर, संगमचे माजी सरपंच रमेश इंगळे, संगम ग्रामपंचायतीचे सदस्य गणेश इंगळे, प्रगतशील बागायतदार यशवंत ताटे, प्रगतशील बागायतदार प्रशांत महाडिक, प्रगतशील बागायतदार नाना पराडे पाटील, संगम ग्रामपंचायतीचे सदस्य सतीश इंगळे, शिवामृत दुध केंद्र संगमचे माजी चेअरमन सुनील पराडे पाटील, संगमचे पोलीस पाटील निळकंठ दळवी, युवा उद्योजक रणजीत महाडिक, युवा उद्योजक बिटू महाडिक, प्रगतशील बागायतदार सौदागर पराडे पाटील, प्रगतशील बागायतदार संजय पराडे पाटील, ग्रामसेवक ज्ञानदेव जाधव, युवा उद्योजक कल्याण इंगळे, माळशिरस विभागाचे कार्यकारी अभियंता अण्णासाहेब काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती संगम ग्रामपंचायतचे सदस्य आकाश पराडे पाटील यांनी दिली आहे. तरी या भूमिपूजन कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng