ताज्या बातम्यासामाजिक

जनसेवा संघटनेचा निष्ठावान शिलेदार व गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा तारणहार हरपला…

श्री शंकर सहकारी साखर कारखाना व शिवामृत दूध संघाचे माजी संचालक विझोरी गावचे सुसंस्कृत व सोज्वळ व्यक्तिमत्व नानासाहेब यशवंत काळे यांनी अखेरचा श्वास घेतला.

विझोरी (बारामती झटका)

विझोरी ता. माळशिरस गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रगतशील बागायतदार सुसंस्कृत व सोज्वळ व्यक्तिमत्व असणारे नानासाहेब यशवंत काळे यांनी गुरुवार दि. ०७/०९/२०२३ रोजी अश्विनी हॉस्पिटल अकलूज येथे अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे निष्ठावान शिलेदार व गोरगरीब सर्वसामान्य जनतेचा तारणहार हरपलेला आहे. स्वर्गीय नानासाहेब काळे यांच्या पश्चात पत्नी रुक्मिणी, मुली सुनीता व सुरेखा, मुलगा मुकुंद, दोन भाऊ, भावजय, दोन बहीण, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर दुपारी 12.30 वाजता विझोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे सर्वेसर्वा महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे निष्ठावान शिलेदार म्हणून त्यांची ओळख होती. नानासाहेब काळे यांनी शिवामृत दूध उत्पादन संघ विझोरी व श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर येथे संचालक पदावर काम केलेले आहे. विजोरी गावामध्ये धवल यश दूध संस्थेचे ते चेअरमन होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून राजकारण व समाजकार्यात कार्य करीत होते. नानासाहेब काळे यांनी समाजामध्ये आपल्या कार्यातून वेगळा ठसा निर्माण केलेला आहे. गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीला उपयोगी पडून अडचणीतील जनतेला दिलासा देण्याचे कायम काम केलेले आहे. सुसंस्कृत व सोज्वळ व्यक्तिमत्व जाण्याने विझोरी व पंचक्रोशीत राजकीय व सामाजिक पोकळी निर्माण झालेली आहे.

स्व. नानासाहेब काळे यांच्या दुःखद निधनाने काळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. काळे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो आणि मृतात्म्यास शांती लाभो हीच बारामती झटका परिवार आणि एसकेपी महाराष्ट्र न्यूज परिवार यांच्यावतीने भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button