ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस तालुक्यातील पोलीस पाटील पदाच्या १८ गावच्या आरक्षण सोडती

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस गावगाड्यांच्यात नागरिक व प्रशासनात समन्वयाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस पाटलांच्या निवडी संदर्भात पदांसाठी आरक्षण सोडत पंचायत समिती सभागृहात प्रांताधिकारी नामदेव टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

गाव गाड्यात पोलीस पाटील हे पद प्रशासकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या सोडतीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. नुकत्याच पार पडलेल्या सोडती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी नामदेव टिळेकर होते. यावेळी तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार अमोल कदम, नायब तहसीलदार सायली जाधव यांच्यासह गावचे नागरिक उपस्थित होते.

असे पडले आरक्षण
पोलीस पाटील गावनिहाय आरक्षण सोडत –
अनुसूचित जमातीसाठी तरंगफळ (महिला), चौंडेश्वरवाडी (महिला) सवतगव्हाण, प्रतापनगर, कदमवाडी, बांगार्डे, चांदापुरी.
भटक्या जमाती (ब) शिंगोर्णी
भटक्या जमाती (क) – कचरेवाडी, डोंबाळवाडी
/हनुमानवाडी (महिला)
भटक्या जमाती ( ड ) मारकडवाडी.
इतर मागासवर्गीय चाकोरे (महीला ), तामशिदवाडी, पठाणवस्ती, लोंढे मोहितेवाडी, मोरोची, शेंडेचिंच (महिला) आर्थिक दृष्ट्या मागास घटक – तोंडले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button