ताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस तालुक्यात विज पडून महिलेचा जागीच मृत्यू

मांडवे गावात दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

माळशिरस (बारामती झटका)

मांडवे ता. माळशिरस येथील सौ‌ सोनाली मुकिंदा कोळपे यांच्या अंगावर विज पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे मांडवे गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

माळशिरस तालुक्यात अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात वरूणराजाचे दुपारी दमदार आगमन झालेले होते. अनेक ठिकाणी पावसाच्या सरी मोठ्या प्रमाणात कोसळत होत्या. अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामध्ये मांडवे गावातील सौ. सोनाली मुकिंदा कोळपे आपल्या शेतामध्ये काम करीत होत्या. पाऊस सुरू असल्याने त्या झाडाखाली थांबलेल्या होत्या. पाऊस बंद झाल्यानंतर पुन्हा शेतामध्ये काम करीत असताना अचानक वीज अंगावर कोसळली असल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे.

मांडवे पंचक्रोशीमध्ये दुःखाची शोककळा पसरलेली आहे. त्यांच्या पाश्चात तीन मुली, एक मुलगा, पती, सासू-सासरे असा परिवार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

5 Comments

  1. Wow, superb blog layout! How long have you been blogging for?
    you make blogging glance easy. The full glance of your web site is great, let alone
    the content! You can see similar here sklep online

  2. Great job on this article! It was very engaging and informative. I’m eager to hear different viewpoints on this. Click on my nickname for more engaging content.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button