पीपल्स रिपब्लिकन पार्टी माळशिरस तालुका कार्यकारणीच्या निवडी रविवारी होणार

अकलूज (बारामती झटका)
राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे सर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे साहेब यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुका कार्यकारणीची निवड रविवार २४ सप्टेंबर रोजी अकलूज येथील शासकीय विश्रामगृह येथे होणार असल्याचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले यांनी सांगितले.
मागील माळशिरस तालुका कार्यकारणी निवडीचा कार्यकाल एक वर्षाचा पूर्ण झाल्याने व पक्षात नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी माळशिरस तालुका व अकलूज शहर कार्यकारणी सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित कांबळे यांच्या सहमतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी बरखास्त केली होती. त्यामुळे माळशिरस तालुका व अकलूज शहर नूतन जेष्ठ कार्यकारणी युवक कार्यकारणी व महिला कार्यकारणीच्या निवडीची बैठक येत्या रविवारी २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शासकीय विश्रामगृह अकलूज येथे आयोजित करण्यात आली आहे.
तरी पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये काम करू इच्छिणाऱ्या भिमसैनिकांनी या बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ अरुण भोसले यांनी केले आहे. निवडीबाबतच्या इतर माहितीसाठी ९४२३३२७६६७ या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng