धनगर समाज संघर्ष समितीच्या युवा प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड. प्रशांत रुपनवर यांची निवड
माळशिरस (बारामती झटका)
धनगर संघर्ष समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष अनंत बनसोडे व प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी यांनी धनगर समाज संघर्ष समितीच्या युवा प्रदेश उपाध्यक्षपदी ॲड. प्रशांत रुपनवर यांची निवड केली आहे. तसेच पत्रही त्यांना देण्यात आले आहे. ॲड. प्रशांत रुपनवर यांच्यावर या निवडीबद्दल परिसरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सदर पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, महापराक्रमी राजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या पराक्रमाला साक्षी ठेवून महान राज्यकर्ती अहिल्यादेवी होळकर यांनी रयतेसाठी चालवलेल्या राज्याचे स्मरण आपणांस नेहमी असावे. संत श्री बाळूमामा यांच्या कृपा आशीर्वादाने या पदावर नियुक्ती केलेली आहे. आपले ध्येय हे आरक्षणाची अंमलबजावणी असून वाड्या-वस्त्या, डोंगराळ भागातील शेवटच्या धनगर बांधवांपर्यंत पोहोचून त्यांचा विकास करण्याची शपथ घेऊन काम करावे, अशा आशयाचे पत्र ॲड. प्रशांत रुपनवर यांना देण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
Great read! The clarity and depth of your explanation are commendable. For further reading, here’s a useful resource: EXPLORE FURTHER. Let’s discuss!