स्व. गणपतराव देशमुख यांच्या परिवाराची खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या भेटीने राजकारणाच्या नवीन नांदीला सुरुवात….
माढा लोकसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीचा नूरच बदलला, शेतकरी कामगार पक्ष, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गोपनीय राजकीय खलबते झाली..
खासदारकीचे बाशिंग घेऊन फिरणाऱ्या उतावळ्या नवऱ्याचे काय होणार ?, मतदार संघात चर्चा सुरू…
सांगोला (बारामती झटका)
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते ऋषितुल्य नेतृत्व महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री स्वर्गीय गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या परिवारांची माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या सदिच्छा भेटीने राजकारणाच्या नवीन नांदीला सुरुवात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सदिच्छा भेटीने माढा लोकसभा मतदार संघाच्या आगामी निवडणुकीचा नूरच बदलला आहे. शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गोपनीय राजकीय खलबते झाली, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचे चिरंजीव शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा देशमुख यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी आबांचे नातू युवा नेते डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख, माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे पाणीदार आमदार बबनदादा शिंदे, भारतीय जनता पक्षाचे सोलापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब उर्फ चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाच्या राजकारणात माढा लोकसभा मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. पहिल्यांदाच पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातील सिंचन व प्रलंबित असणारे रेल्वे मार्ग व स्टेशन यांचे प्रश्न मार्गी लावून मतदार संघातील छोटी मोठी कामे, रस्ते, स्ट्रीटलाईट अशी अनेक विकासकामे धुमधडाक्यात सुरू आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येत आहेत. त्यामध्ये माण खटावचे भाजपचे जयकुमार गोरे, फलटणचे राष्ट्रवादीचे दीपक चव्हाण, माळशिरसचे भाजपचे राम सातपुते, माढ्याचे राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे, करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष संजयमामा शिंदे, सांगोल्याचे शिवसेनेचे शहाजीबापू पाटील असे आमदार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांचे सरकार स्थापन झालेले होते. काही महिन्यानंतर अजितदादा पवार सरकारमध्ये सामील झालेले असल्याने माढा लोकसभा मतदार संघात आमदार बबनदादा शिंदे व संजयमामा शिंदे उघडउघड खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समवेत उद्घाटन कार्यक्रम करून भविष्यात राजकारणात सोबत असल्याचे जाहीरपणे सांगत आहेत. सांगोला विधानसभेचे आमदार शहाजीबापू पाटील हेही सोबत आहेत.
स्वर्गीय गणपतरावजी देशमुख उर्फ आबासाहेब यांच्या परिवारांची सदिच्छा भेट खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घेऊन नवीन नांदीला सुरुवात करून माढा लोकसभा मतदार संघाच्या आगामी निवडणुकीचा नूर बदलला आहे. त्यामुळे खासदारकीसाठी बाशिंग घेऊन फिरणाऱ्या उतावळ्या नवऱ्याचे काय होणार ?, याचीही खुमासदार चर्चा मतदार संघासह सोलापूर जिल्ह्यात रंगलेली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
I found this article both informative and enjoyable. It sparked a lot of ideas. Lets chat more about it. Check out my profile!