दसरा व दिवाळीनिमित्त खंडाळी व वेळापूरमध्ये भारत डाळ उपक्रम
वेळापूर (बारामती झटका)
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून व भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय आणि नाफेड यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळी सणानिमित्त भारत डाळ हा उपक्रम शनिवार दि. 28 ऑक्टोबर रोजी खंडाळी व वेळापूर, ता. माळशिरस येथे राबविण्यात येत आहे.
खंडाळी येथील दत्त मंदिराजवळ शनिवारी सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत डाळ वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी विनोद थिटे 9767558828 यांच्याशी संपर्क साधावा तर वेळापूर येथे अर्धनारी नटेश्वर मंदिर जवळ सकाळी 11 ते सायंकाळी 04 वाजेपर्यंत डाळ वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी ओंकार खराडे 9503963397 व ओंकार आडत 7030596512 यांच्याशी संपर्क साधावा.
एका आधार कार्डवरती 60 रुपये प्रति किलो प्रमाणे 5 किलो डाळ देण्यात येणार आहे. सरकारच्या वतीने बाहेरच्या किंमतीपेक्षा कमी दराने नागरिकांसाठी डाळ उपलब्ध करून देण्यात आली असून याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक अटल प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Fantastic perspective! I found myself nodding along. For additional info, click here: LEARN MORE. What’s everyone’s take?