ताज्या बातम्या

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना साखर आयुक्त यांचा दिलासा; कामगारांची दिवाळी गोड होणार.

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन ग्रॅज्युटी मिळण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक व साखर आयुक्त यांना निवेदन देण्यात आले होते.

पुणे (बारामती झटका)

श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर, ता. माळशिरस, येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक, एनसीडीसी पुणे व साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य पुणे यांना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सही असलेले निवेदन दिले होते. सदरचे निवेदन व्यवस्थापकीय संचालक व साखर आयुक्त यांनी सकारात्मक चर्चा करून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अनेक दिवस रखडलेला जीवन मरणाचा प्रश्न निकालात काढण्याचे आयुक्त कार्यालयातील विश्वासनीय सूत्र हाती आलेले असल्याने श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या विरोधात शिमगा करण्याची वेळ आलेली होती. व्यवस्थापकीय संचालक व साखर आयुक्त यांच्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, सदाशिवनगर या कारखान्याला केंद्र सरकारची एनसीडीसी नवी दिल्लीकडून ११३ कोटी ४२ लाख रुपये रक्कम दि. १/९/२०२३ रोजी कारखान्याच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते. या कर्जाला थक हमी महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. यापैकी १७ कोटी ५० लाख रुपये आजी-माजी कर्मचाऱ्यांचे पगार व थकीत वेतन दि. ३०/९/२०२२ पर्यंत साठी दिले होते. १७ कोटी ५० लाख रुपयांपैकी आजी-माजी कर्मचाऱ्यांना अंदाजे १ कोटी ५० लाख रुपये फक्त वाटलेले आहेत. निवेदनावर सह्या केलेल्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्या पैशांपैकी एक रुपयाही मिळाला नाही. दोन महिन्यांपासून कारखान्याचे कार्यकारी संचालकांकडे मागणी केली आहे. तरी मागील दोन महिन्यात त्यांना तुम्ही पैसे देऊन आम्हाला एक रुपयाही देण्यात आला नाही.

साखर आयुक्तांकडे जबाबदारी दिली होती. शासनाने त्या-त्या हेडला पैसे दिले होते. व कर्मचाऱ्यांसाठी १७ कोटी ५० लाख रुपये दिले होते. पण, कारखाना ते पैसे आम्हाला देण्यासाठी तयार नाही. इतर ठिकाणी खर्च करणार आणि तुम्हाला ११३ कोटी ४२ लाख रुपयांचा पूर्ण हिशोब देणार. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी ३० ते ३५ वर्ष या कारखान्यामध्ये सेवा केली आहे. आमच्यावर सतत अन्याय होत आहे. आता या वृद्धावस्थेमध्ये कारखान्याकडे सतत हेलपाटे व वादविवाद घालण्याची आमची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना सह्या असलेल्या सर्वजणांची रक्कम कोर्टाच्या आदेशानुसार व्याजासह एक रकमी देण्याचे आदेश पारित करावे नाहीतर कार्यकारी संचालकांवर कारवाई किंवा निलंबित करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आलेले होते. सदरच्या निवेदनावर हनुमंत किसन ढगे पुरंदावडे, प्रदीपसिंह शंकरराव कदम विजयवाडी, महादेव जगु ढगे पुरंदावडे, चंद्रकांत काशिनाथ शिंदे राणंद, बापू लक्ष्मण पिसे माळशिरस, महादेव गेनबा ननवरे नातेपुते, शिवाजी यादव साळुंखे, नातेपुते भरत आनंदा गोरे कुरभावी, श्रीकांत वसंत कुलकर्णी पुरंदावडे, आबा यशवंत बंदुके मांडवे, विष्णू गुलाब रणनवरे माणकी, अरुण आबा मगर गारवाड आदी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या या निवेदनावर सह्या केलेल्या होत्या.

बारामती झटका वेब पोर्टल व युट्युब चॅनल संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी प्रसार माध्यमांच्यामधून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या व्यथा व अडचणी मांडलेल्या होत्या. व्यवस्थापकीय संचालक व साखर आयुक्त यांनी कामगारांच्या व्यथा जाणून घेऊन लवकरच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button