सदाशिवनगर येथे दिपावली तेजोमय व आकर्षक करुन कुटुंबाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी साक्षी व्हरायटी ला आवर्जून भेट द्यावी
आपणांसर्वांस दीपावलीच्या शुभपर्वानिमित्त सस्नेह नमस्कार, मनःपूर्वक शुभेच्छा…
सदाशिवनगर (बारामती झटका)
हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव येत असतात. मात्र, सणांचा राजा म्हणून दीपावली सणाकडे गोरगरीब व श्रीमंत लोकांचे लक्ष असते. पाच दिवस असणारा दीपावली सण परिस्थिती कशीही असली तरी आपल्या कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या समवेत साजरा केला जातो. दीपावली तेजोमय व आकर्षक करण्यासाठी जीवनातील अंधार घालवण्यासाठी घरासमोर आकाशकंदील व पणती लावले जातात. सदाशिवनगर येथील सुज्ञे परिवार यांनी साक्षी व्हरायटीज या दुकानांमध्ये वेगवेगळे डिझाईनमध्ये आकाशकंदील व आकर्षक पणती उपलब्ध केलेल्या आहेत. माफक दरात सर्वसामान्य व गोरगरीब ग्राहकांना परवडेल आणि श्रीमंतांना आवडेल, असे आकर्षक व नक्षीदार दीपावली साहित्य येणा-जाणाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
सदाशिवनगर येथील पुणे-पंढरपूर रोडवर नातेपुतेकडून माळशिरसकडे जाणाऱ्या डाव्या बाजूला साक्षी व्हरायटीज दुकान आहे. ग्राहकांनी अवश्य आपली दीपावली तेजोमुळे व आकर्षक बनविण्यासाठी एकदा आवश्य भेट द्यावी.
दीपावली सणाला कालपासून सुरुवात झालेली आहे
९ नोव्हेंबर २०२३ – वसुबारस
गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता,
प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणांस लाभो !
१० नोव्हेंबर २०२३ – धनत्रयोदशी
धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत. निरामय आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो. धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो.
१२ नोव्हेंबर २३ – नरकचतुर्दशी
सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा. अन्यायाचा प्रतिकार करण्याचं बळ
आपल्याला लाभो. आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो. आपणांस स्वर्गसुख नित्य लाभो.
१२ नोव्हेंबर २०२३ – लक्ष्मीपूजन
लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा. नेहमी चांगल्या मार्गाने आपणांस लक्ष्मी प्राप्त
होवो. लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो.
१४ नोव्हेंबर २०२३ – पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा. सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो.
१५ नोव्हेंबर २०२३ – भाऊबीज
जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे. भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहू दे.
ही दीपावली आपणांस आणि आपल्या कुटुंबास आनंदाची आणि भरभराटिची जावो…
बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चॅनल, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर. मो. 9850104914
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.