माळशिरस तालुक्यातील थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार यांना पडलेली मते व निवडून आलेले सरपंच…

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतमआबा माने पाटील गटाचे बाजीराव माने सर्वाधिक्य मताधिक्य घेऊन थेट जनतेतील सरपंच पदाचे बाजीराव च “सिंघम” झालेले आहेत.
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये देशमुखवाडी व सवतगव्हाण गावातील थेट जनतेतील सरपंच बिनविरोध झालेले आहेत. आठ गावांमध्ये चुरशीची व रंगतदार निवडणूक झालेल्या आहेत.
थेट जनतेतील सरपंच पदाचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे –
कारूंडे – नंदा कैलास नामदास 1405,थ निर्मला विजय गायकवाड 1213, कोणालाच नाही नोटा 11 अशी मते पडलेली आहेत. नंदा कैलास नामदास यांचा 192 मताधिक्याने विजय झालेला आहे.
धर्मपुरी – नीता नवनाथ झेंडे 1166, मनीषा संजय झेंडे 661, माधुरी सागर झेंडे 621, सोनाली प्रमोद बनसोडे 601, कोणालाच नाही नोटा 09, अशी मते पडलेली आहेत. 505 मताधिक्याने निता नवनाथ झेंडे निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या विरोधात 1883 मध्ये पडलेली आहेत.

दहिगाव – सोनल रणजीत खिलारे 2482, अपेक्षा मुकुंद मोरे 2052, कमल धन्यकुमार खिलारे 896, कोणालाच नाही नोटा 32 अशी मते पडलेली आहेत. सोनल रणजीत खिलारे 430 मताधिक्याने निवडून आलेल्या आहेत. त्यांच्या विरोधात 2948 मते पडलेली आहेत.
कण्हेर– बाजीराव महादेव माने 2156, सोनल दत्तात्रय माने 1538, कोणालाच नाही नोटा 07 अशी मते पडलेली आहेत. बाजीराव महादेव माने यांचा 618 मताधिक्याने विजय झालेला आहे.
माळीनगर – अनुपमा अनिल एकतपुरे 2731, सारिका निलेश एकतपुरे 2416, कोणालाच नाही नोटा 73 अशी मते पडलेली आहेत. अनुपमा अनिल एकतपुरे यांचा 315 मताधिक्याने विजय झालेला आहे.
लवंग – प्रशांत विजयकुमार पाटील 1503, प्रदीप शहाजी कदम 1321, राहुल कुमार टिक 1140, दयानंद भिमराव भोसले 17, कोणालाच नाही नोटा 07 अशी मते पडलेली आहेत. प्रशांत विजयकुमार पाटील यांचा 182 मताधिक्याने विजय झालेला आहे. त्यांच्या विरोधात 2478 मते पडलेली आहेत.
वाफेगाव – विजया एकनाथ शिंदे 658, मंगल विष्णू शिंदे 546, कोणालाच नाही नोटा. 04 अशी मते पडलेली आहे विजया एकनाथ शिंदे यांचा 112 मताधिक्याने विजय झालेला आहे.
कोंढारपट्टा – प्रकाश लक्ष्मण जाधव 421, अरुण शिवाजी भोसले 343, कोणालाच नाही नोटा 3 अशी मते पडलेली आहेत. प्रकाश लक्ष्मण जाधव यांचा 78 मताधिक्याने विजय झालेला आहे.

थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच पदाच्या चर्चेच्या व रंगतदार निवडणुकीत सर्वात जास्त मताने माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य गौतम आबा माने पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने पाटील यांच्या गटाचे बाजीराव महादेव माने यांनी सर्वात जास्त 618 मताधिक्य घेऊन विजय संपादन करून कण्हेर गावचे बाजीराव “सिंघम” झालेले आहेत. माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे सहाय्यक पोलीस निरीक्षक होळकर, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी चोक बंदोबस्त ठेवून निर्भयपणे व शांततेत मतदान व मतमोजणी पार पडलेली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



