ताज्या बातम्यासामाजिक

“याची देही याची डोळा, देखिला आनंदाचा सुख सोहळा”, विठ्ठल सातपुते यांनी पाहिला दिवाळीत आनंदाचा सोहळा.

माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ. संस्कृती सातपुते यांनी ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड करून निरागस चेहऱ्यावर आनंद फुलविला.

मांडवे (बारामती झटका)

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांच्या धर्मपत्नी सौ. संस्कृती राम सातपुते यांनी ऊसतोड मजुरांची दिवाळी गोड करून लहान मुलांच्या निरागस चेहऱ्यावर आनंद फुलविला. ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ऊसतोड मजूर म्हणून काम केले असे विठ्ठल सातपुते यांच्या समवेत सुनबाई यांनी सामाजिक बांधिलकी जपत ऊसतोड कामगारांच्या पालावरील झोपडीत जाऊन दिवाळीचा गोडधोड फराळ, आनंद द्विगुणीत करणारे नवीन कपडे, आनंद साजरा करणारे फटाके असे सर्व साहित्य घेऊन ऊसतोड मजुरांच्या महिला व लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलेले आहे. “याची देही याची डोळा, देखिला आनंदाचा सुख सोहळा”, विठ्ठल सातपुते यांनी पाहिला दिवाळीत आनंदाचा सोहळा. असा अविस्मरणीय प्रसंग मांडवे गावच्या ऊसतोड मजुरांची दीपावली आनंदाची व गोड केलेली असल्याने पुरुष, महिला व लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

ऊसतोड मजूर यांच्या व्यथा विठ्ठल सातपुते यांनी सोसलेल्या आहेत. ऐन दिवाळीत गावाकडून ऊस तोडण्याकरता कारखान्याकडे यावे लागते. अशा वेळेला दिवाळी साजरी करण्याची चणचण व अडचण भासत असते. विठ्ठल सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या परिसरात ऊसतोड मजूर म्हणून काम केलेले आहे. विशेष म्हणजे त्यांचे चिरंजीव राम सातपुते यांना माळशिरस विधानसभेचे आमदार होण्याचा बहुमान मिळालेला आहे. स्वकर्तुत्वाने जनतेच्या मनावर अधिराज्य करून समाजामध्ये आपला वेगळा ठसा राम सातपुते यांनी उमटविलेला आहे. ऊसतोड मजुराचा पोरगा आमदार झाले, म्हणून अभिमानाने सांगत असतात.

वडील विठ्ठल सातपुते व आई स्वर्गीय जिजाबाई सातपुते यांच्या संस्काराची शिदोरी घेऊन राम सातपुते यांची समाजसेवा करण्याची वाटचाल सुरू आहे. त्यांना नावातच संस्कृती असणाऱ्या सुसंस्कृत स्वभावाच्या सौ. संस्कृती धर्मपत्नी म्हणून लाभलेल्या आहेत. त्यांनी ऊसतोड मजूर कामगारांचे जीवन अनुभवलेले नाही. मात्र, ऊसतोड मजुरांचे जीवन ऐकून त्यांच्या सुद्धा मनामध्ये ऊसतोड मजूरांविषयी अस्मिता व जिव्हाळा कायम असतो. दीपावलीच्या वेळी ऊसतोड मजुरांच्या पालावर जाऊन मजुरांची दिवाळी गोड व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम करीत असतात. पूर्वीच्या काळी विठ्ठल सातपुते यांनी सुद्धा कोणाच्यातरी हातून अशी दिवाळी घेतलेली असेल.

माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार आमदार यांच्यामुळे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे आणि एक दिवस देणाऱ्याचे हात होऊ याच न्यायाप्रमाणे विठ्ठल सातपुते यांच्या उपस्थितीत सातपुते परिवार यांनी दिवाळी गोड करून लहान व निरागस बालकांच्या चेहऱ्यावर आनंद आणलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button