माळशिरस तालुक्यातील उपसरपंच पदाच्या निवडी उद्या होणार

धक्कादायक उपसरपंच पदाची नियुक्ती होण्याची शक्यता ???
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील माळीनगर, धर्मपुरी, कारुंडे, वाफेगाव, कोंढारपट्टा, दहिगाव, लवंग, कन्हेर, सवतगव्हाण, देशमुखवाडी या दहा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुका संपन्न झालेल्या आहेत. आता उपसरपंच पदाच्या निवडी बुधवार दि. २२/११/२०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहेत. या निवडीचा निकाल दुपारी २ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
सदरच्या निवडी माळशिरस पंचायत समितीकडून निवडणूक अधिकारी व ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहेत. माळीनगर ग्रामपंचायतीत ए. टी. डोके निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. धर्मपुरी ग्रामपंचायतीत ए. एम. सरवदे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कारुंडे ग्रामपंचायतीत पी. आर. लोंढे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. वाफेगाव ग्रामपंचायतीत नितीन चव्हाण कृषी अधिकारी, निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कोंढारपट्टा ग्रामपंचायतीत स्वप्नील वाघमारे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. दहिगाव ग्रामपंचायतीत एस. व्ही. जाधव निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. लवंग ग्रामपंचायतीत एच. ए. गायकवाड निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. कन्हेर ग्रामपंचायतीत ए. एल. सावळजकर निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सवतगव्हाण ग्रामपंचायतीत आर. यु. डोके निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. देशमुखवाडी ग्रामपंचायतीत सुरज वासुदेव निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
या उपसरपंच पदाच्या निवडीकडे संपूर्ण माळशिरस तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Great read! Your perspective on this topic is refreshing. For additional information, I recommend visiting: DISCOVER MORE. What do others think?