राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पै. अक्षय भांड यांचे महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांना निवेदन
माळशिरस तालुक्यातील अंगणवाडी डिजिटल बनवणे व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी
माळशिरस (बारामती झटका)
बालविकास योजनेअंतर्गत माळशिरस तालुक्यातील अंगणवाडी डिजिटल बनवणे व मूलभूत सोयी उपलब्ध करण्याबाबतची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष पैलवान अक्षयभैय्या भांड यांनी महिला बालविकास मंत्री नामदार अदिती ताई तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
माळशिरस तालुक्यामध्ये नातेपुते येथे तीन, फोंडशिरस येथे दोन, दहिगाव येथे दोन, कन्हेर येथे एक, मांडवे येथे तीन, गिरवी येथे एक, फडतरी येथे एक, गुरसाळे येथे एक, शिंदेवाडी येथे एक, धर्मपुरी येथे दोन, पिरळे येथे एक, सदाशिवनगर येथे दोन, माळीनगर येथे दोन, अकलूज येथे तीन, एकशीव येथे एक, लोणंद येथे एक, वेळापूर येथे दोन, श्रीपूर येथे तीन, कोळेगाव येथे दोन तर माळशिरस येथे तीन या अंगणवाड्यांमध्ये मूलभूत सोयी उपलब्ध करून त्या डिजिटल बनवण्याबाबतची मागणी करण्यात आली आहे. या मागणीला मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच अंगणवाडी डिजिटल होणार असल्याचे आश्वासन दिले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.