महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची राज्यकारणी बैठकीचे आयोजन

पुणे (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्य कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटनेची राज्यकारणीची बैठक व सभासद समन्वय सभा रविवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता श्रीक्षेत्र पोहरादेवी ता. मनोरा, जि. वाशिम येथे होणार आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे विभागीय अध्यक्ष श्री. हनुमंत वगरे यांनी केलं आहे.


यावेळी संघटनेच्या राज्य व विभागीय कार्यकारणीची पुनर्रचना व वर्षभरात केलेल्या कामकाजाचा आढावा, संवर्गाच्या न्यायालयीन निकालावर आधारित वेतन त्रुटी दूर करून कृषी सहाय्यक यांच्याप्रमाणे वेतन संरचना लागू करणेबाबतच्या फाईलचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करणे, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यापैकी एक पद रद्द करणे, ग्रामसेवक संवर्गातील अतिरिक्त कामाचा ताण कमी करणे, जॉब चार्ट सुधारणा, जुनी पेन्शन योजना, तांत्रिक दर्जा, उच्चशिक्षित कृषी पदवीधर ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना विस्तार अधिकारी कृषी या पदावर प्राधान्याने पदोन्नती देणे, हंगामी जिल्हा कार्यकारणीस राज्य कार्यकारणीत मान्यता देऊन नियमित करणे, इत्यादी विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.