राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. कमलाकर दावणे यांचा धानोरे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार

धानोरे (बारामती झटका)
धानोरे गावचे आधारवड, कृषी पर्यवेक्षक श्री. अनिलकाका देशमुख साहेब व मा. सरपंच श्री. औदुंबर देशमुख सर यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. कमलाकर दावणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच सोलापूर जिल्हा मराठा समन्वय समितीचे प्रमुख श्री. माऊली पवार साहेब, ॲड. श्री. श्रीरंग लाळे साहेब, पोलीस श्री. आतिष पाटील साहेब, मराठा आंदोलनाच्या वेळस ७ दिवस आमरण उपोषण करणारे श्री. प्रशांत देशमुख यांचाही धानोरे ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी सोलापूर जिल्हा मराठा समन्व्यक श्री. माऊली पवार, ॲड. श्री. नाळे साहेब, कृषी पर्यवेक्षक श्री. अनिलकाका देशमुख, उपोषणकर्ते प्रशांत देशमुख व आदर्श शिक्षक श्री कमलाकर दावणे यांनी मनोगत व्यक्त केली
यावेळी मा. सरपंच मोहनआप्पा क्षीरसागर, विद्यमान सरपंच सौ. छाया दावणे, उपसरपंच श्री. मंगेश (दादा) देशमुख, मा. उपसरपंच श्री. अभिलाष देशमुख, मा. तंटामुक्ती अध्यक्ष सुशेन आप्पा ताटे, कार्यकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन मधुकर (तात्या) पाटील, मुख्याध्यापक श्री. गंगाराम मोहिते सर, श्री. रावसाहेब देशमुख (दादा), चेअरमन विलास (बप्पा) देशमुख, युवा नेते अमोल देशमुख, ग्रा. सदस्य मधुकर क्षीरसागर, भारत दावणे, गोरख दावणे, मा. ग्रा. सदस्य मोहन दावणे, श्री. सूरज दावणे, श्री. विजय दावणे, संजय दावणे, श्री. कचरु दावणे, दत्तात्रय दावणे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील युवराज पवार, ग्रामपंचायत कर्मचारी श्री. राऊत, सर्व पाणी फाऊंडेशन टीम व सर्व धानोरे ग्रामस्त मोठया संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विलास देशमुख यांनी केले तर आभार श्री. मंगेश देशमुख यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.