कन्हेर, भानवसे वस्ती येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मोहन पवार तर उपाध्यक्षपदी सचिन काळे यांची निवड

कन्हेर (बारामती झटका)
कन्हेर ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी मोहन मच्छिंद्र पवार तर उपाध्यक्षपदी सचिन मारुती काळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीवेळी माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती शंकर भानवसे, कन्हेर ग्रामपंचायतीचे नूतन सदस्य दादासाहेब चव्हाण, पै. महादेव वाघमोडे, अमोल मिसाळ, गणेश माने, महादेव येळे, रणजीत चव्हाण, श्रीरंग माने, अरुण काळे, माजी उपसरपंच आबासाहेब सरगर, शरद माने, प्रदीप पवार, रविराज काळे, सुजित पवार, बंडू पवार, गणेश काळे, बंडू भडके, अभिजीत पवार, बापू भानवसे, संतोष ठवरे, उद्धव माने, गणेश माने, काकासाहेब काळे आदी मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष मोहन मच्छिंद्र पवार यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भानवसे वस्ती यांना डिजिटल संगणक घेण्यासाठी एक लाख पाच हजार रुपये रोख देण्यात आले. तर उपाध्यक्ष सचिन मारुती काळे यांच्याकडून आरो फिल्टरसाठी वीस हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.