ताज्या बातम्याराजकारण

दहिगाव ग्रामपंचायतच्या आशाताई संभाजी फुले नाट्यमयरीत्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सोनल रणजीत खिलारे तटस्थ, १८ सदस्यांपैकी उपस्थित १२ सदस्यांनी आशाताई फुले यांना ११ तर मनीषा पवार यांना ० मते दिली.

दहिगाव (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची व मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या दहिगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आशाताई संभाजी फुले नाट्यमय रित्या विजयी झालेल्या आहेत. थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सोनल रणजीत खिलारे तटस्थ राहिलेल्या आहेत. यावेळी १८ सदस्यांपैकी १२ सदस्य उपस्थित होते. मतदानामध्ये आशाताई फुले यांना ११ तर मनीषा पवार यांना ० मते पडलेली आहेत.

दहिगाव ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच सोनल रणजीत खिलारे यांच्या अध्यक्षतेखाली माळशिरस पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. एस. व्ही. जाधव निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामविकास अधिकारी दीपक गोरे यांनी सहकार्य केले.

उपसरपंच पदासाठी शुभांगी संदीप सावंत, मनीषा सचिन पवार, आशाताई संभाजी फुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. त्यापैकी शुभांगी संदीप सावंत यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेला होता. त्यामुळे आशाताई फुले व मनीषा पवार यांच्यात उपसरपंच पदाची निवडणूक झालेली होती. सरपंच व ग्रामपंचायत सदस्य अशी १८ सदस्य संख्या असणाऱ्या पैकी सोनल रणजीत खिलारे, सविता धनाजी ढगे, मोनाली अतुल मोरे, मिताली बाळासाहेब कदम, महादेव साहेबराव काळे, लताबाई धनाजी खुसपे, छाया अर्जुन सरवदे, रामचंद्र काशिनाथ फुले, आशा संभाजी फुले, वर्षा पांडुरंग पाटील, संध्या सतीश बनकर, शुभांगी संदीप सावंत, चांगुणा जयवंत साळवे, रोहिणी सोमनाथ खंडागळे, मनीषा सचिन पवार, नीला महादेव अवघडे, शुभांगी राहुल निकम, सारिका रवींद्र चिकणे असे १८ सदस्य आहेत. त्यापैकी लताबाई खुसपे, छाया सरवदे, चांगुणा साळवे, मनिषा पवार, नीला अवघडे, शुभांगी निकम गैरहजर होते. उपस्थित १२ सदस्यांना मतदानाविषयी निवडणूक निरीक्षक यांनी विचारले असता मतदान हात वर करून घ्यावयाचे ठरले. त्यावेळेस आशाताई फुले यांच्या मतदानाच्या वेळी ११ सदस्यांनी हात वर केले तर, मनीषा पवार यांच्या मतदानाच्या वेळी एकही हात वर झालेला नाही. लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच यांनी तटस्थ भूमिका घेतलेली होती. त्यानंतर आशाताई फुले यांचा विजय घोषित करण्यात आला.

दहिगाव ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच चार गट एकत्र येऊन ग्रामपंचायत निवडणूक लढलेले होते. उपसरपंच पदाच्या निवडीवेळी चार गटांमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळून आली. देवदर्शन व टूरवर ग्रामपंचायत सदस्य यांना घेऊन गेलेले होते. त्यामुळे गावातील मतभेद सुरू झाले. चारही गटातील ग्रामपंचायत सदस्य अदलाबदल झालेले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध वार्ड क्र. ३ मधील आशाताई संभाजी फुले उपसरपंच झालेल्या आहेत तर त्यांना उमेदवारीला सूचक रामचंद्र काशिनाथ फुले झालेले आहेत. हेही वार्ड क्र. ३ मधून बिनविरोध निवडून आलेले होते.

लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच सोनल रणजीत खिलारे यांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे. कारण निवडणुकीत चारही गटाचे सहकार्य असल्याने कोणत्याच गटाला नाराज करायला नको, अशी भूमिका त्यांनी घेतलेली होती. उपसरपंच पदाच्या निवडीत मात्र अनेकांचा अपेक्षाभंग झालेला आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button