माढा मतदारसंघातील विविध रस्ते कामांसाठी 54 कोटी निधी मंजूर – आ. बबनदादा शिंदे

माढा (बारामती झटका)
माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांच्या कामासाठी डिसेंबर 2023 चे पुरवणी अर्थसंकल्पात 54 कोटी निधीची तरतुद करण्यात आली आहे. त्यामध्ये माढा तालुक्यातील 20 रस्त्यांचा, पंढरपूर तालुक्यातील 10 व माळशिरस तालुक्यातील 3 अशा एकुण 33 रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा करणेसाठी निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. बबनराव शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना आ. शिंदे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार, ना. देवेंद्रजी फडणवीस व सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचेकडे रस्त्यांच्या कामांना निधी मिळणेबाबत मागणी केली होती. त्यानुसार माढा विधानसभा मतदारसंघातील माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील विविध रस्त्यांचे कामासाठी डिसेंबर 2023 चे पुरवणी अर्थसंकल्पात 54 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांच्या कामांमुळे माढा मतदारसंघात दळणवळण सुलभ होण्यास मदत होणार आहे.
अर्थसंकल्पात तरतुद करण्यात आलेले रस्ते व निधी
माढा तालुका –
1) दारफळ ते भुईंजे रस्ता – रु. 2 कोटी, 2) खैराव ते बुद्रुकवाडी रस्ता- रु. 2 कोटी, 3) टेंभुर्णी-बेंबळे रस्ता ते मिटकलवाडी (माळेगांव) रस्ता – रु. 2 कोटी, 4) सोलंकरवाडी ते नॅशनल हायवे-9 रस्ता – रु. 2 कोटी, 5) टेंभुर्णी ते कन्हेरगांव रस्ता- रु. 1 कोटी, 6) दहिवली-निमगांव-पिंपळनेर-उजनी-व्होळे-भेंड-अरण-तुळशी-रस्ता (भाग- पिंपळनेर स्टॅन्ड पासून)- रु.1.50 कोटी, 7) शिराळ (मा) ते उजनी (मा) रस्ता-रु. 1 कोटी, 8) चिंचोली ते सापटणे रस्ता-रु. 60 लाख, 9) प्रजिमा-128 ते वडोली-नगोर्ली-शिराळ (टें)-सुर्ली-अकोले (खु) रस्ता (भाग-नगोर्ली ते रा.मा.-9)-रु.1 कोटी, 10) माढा ते वैराग रस्ता (भाग- रेल्वे क्रॉसिंग ते दारफळ फाटा)- रु. 2 कोटी, 11) टेंभुर्णी-बेंबळे-परिते-वरवडे-व्होळे-भेंड-पडसाळी-चिंचोली-माढा रस्ता (भाग- भेंड-पडसाळी-चिंचोली) – रु. 2.50 कोटी, 12) केवड ते अंजनगांव (उ) रस्ता – रु. 1.50 कोटी, 13) उपळाई (खु) ते उंदरगांव रस्ता- रु. 1 कोटी, 14) परीते ते घोटी रस्ता- रु. 1 कोटी, 15) प्रजिमा-128 ते ओंकारेश्वर मंदिर रांझणी रस्ता – रु. 1 कोटी. 16) दहिवली-निमगांव-पिंपळनेर-उजनी-व्होळे-भेंड-अरण-तुळशी-रस्ता – रु. 2.50 कोटी. 17) बार्शी-मालवंडी-मानेगांव-नरखेड-भोयरे रस्ता- रु.4.60 कोटी, 18) दारफळ ते उंदरगांव रस्ता- रु. 50 लाख,19) चिंकहिल-तडवळे-वडशिंगे ते दारफळ रस्ता- रु. 3 कोटी, 20) जाधववाडी ते इजिमा-141 रस्ता- रु. 1 कोटी,

पंढरपूर तालुका –
1) करोळे ते कान्हापूरी रस्ता-रु. 3 कोटी, 2) रोपळे-खरातवाडी-जाधववाडी रस्ता-रु. 1 कोटी, 3) खेडभोसे-पवारवस्ती रस्ता-रु. 70 लाख, 4) पिंपळनेर-सापटणे-वेणेगांव-बेंबळे-कान्हापूरी-उंबरे-करोळे रस्ता-रु 1.50 कोटी, 5) रोपळे-तुंगत-सुस्ते रस्ता-रु 1.20 कोटी, 6) प्ररामा-8 ते भोसे-खेडभोसे ते खेडभाळवणी-गादेगांव रस्ता (भाग-भोसे-गावडेमळा ते सुगांव खेडभोसे)- रु 1 कोटी, 7) प्ररामा-8 ते खेडभोसे-देवडे-पटकुरोली-आवे-नांदोरे रस्ता (भाग-आवे ते नांदोरे)- रु 2.50 कोटी, 8) अजनसोंड ते रा.मा.390 रस्ता- रु. 1 कोटी, 9) गुरसाळे-बाभुळगांव-नारायण चिंचोली-इश्वर वठार रस्ता (भाग-ना.चिंचोली ते बाभूळगांव)- रु. 1 कोटी, 10) खेडभोसे-पवारवस्ती-खळगेवस्ती ते शेवते रस्ता- रु.1 कोटी,
माळशिरस तालुका –
1) उंबरे (वेळापूर) ते श्रीपूर प्रजिमा-118 ला मिळणारा रस्ता (भाग-उंबरे (वे) ते श्रीपूर) – रु. 3 कोटी, 2) रा.मा.145 ते महाळुंग श्रीपूर 15 सेक्शन ते नेवरे (भाग – श्रीपूर ते 15 सेक्शन ते नेवरे)- रु. 2 कोटी. 3) वाफेगांव ते बेंबळे रस्ता-रु. 1 कोटी
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.