ताज्या बातम्याराजकारण

माळशिरसचे नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी नगरपंचायत सभागृहाचा नाद सोडून जिल्हा परिषद व विधानपरिषद सभागृहाचा नाद करावा…

भाजपचे ओबीसी सेल राज्य उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे विशेष निमंत्रित सदस्य डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या समर्थकांतून अपेक्षा व्यक्त होत आहे.

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष डॉ. अप्पासाहेब एकनाथ देशमुख यांनी माळशिरस नगरपंचायत सभागृहाचा नाद सोडून सोलापूर जिल्हा परिषद व महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या सभागृहाचा नाद करावा, अशी डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांच्या समर्थकांतून व मित्रपरिवारातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डॉ. अप्पासाहेब देशमुख ओबीसी सेल राज्य उपाध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे विशेष निमंत्रित सदस्य पदावर काम करीत आहेत. देशात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे विचाराचे सरकार आहे. त्यांनी माळशिरस नगरपंचायत जनतेच्या व सर्व सामान्य नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ तयार केलेले आहे, विकासकामांचा डोंगर उभा केलेला आहे. त्यामुळे माळशिरस नगरपंचायतीची विकासाकडे वाटचाल सुरू आहे.

डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी श्रीनाथ मित्रपरिवार व आप्पासाहेब देशमुख मित्रपरिवार यांच्या माध्यमातून समाज उपयोगी सामाजिक कार्यातून जनसंपर्क तयार केलेला आहे. श्रीनाथ विद्यालय व जुनिअर कॉलेजची निर्मिती करून 5000 विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जनाचे काम सुरू आहे. माळशिरस नगरपंचायतीमध्ये नगरसेवक, उपनगराध्यक्ष व नगराध्यक्ष पदावर काम केलेले आहे. देशमुख परिवारातील चुलती द्रोपदी बाजीराव देशमुख यांनी नगराध्यक्ष पदावर काम केलेले होते तर सध्या पत्नी सौ. अर्चना आप्पासाहेब देशमुख व चुलत बंधू विजयराव बाजीराव देशमुख विद्यमान नगरसेवक आहेत. नगरपंचायतीमध्ये सर्व पदावर काम केलेले डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचे समर्थक व मित्रपरिवार यांच्यातून मागणी व्यक्त होत आहे, नगरपंचायत सभागृहाचा नाद सोडून सोलापूर जिल्हा परिषद व महाराष्ट्र विधान परिषद सभागृहाचा नाद करावा. डॉ. आप्पासाहेब देशमुख यांनी धनगर समाजामध्ये आपले वेगळे स्थान निर्माण करून इतर समाजामध्येही सलोख्याचे व जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केलेले आहेत. माळशिरस नगरपंचायत हद्द सोडून मोटेवाडी, माळशिरस, तिरवंडी, कचरेवाडी, गोरडवाडी या गावांमध्ये मतदानाची नोंद करून सोलापूर जिल्हा परिषद निवडणूक लढवावी‌. सध्या ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी सोलापूर जिल्हा अध्यक्ष पद आरक्षण पडलेले आहे.

धनगर समाजामध्ये निष्कलंक व चारित्र्यसंपन्न चेहरा असणारे डॉ. आप्पासाहेब देशमुख साधी राहणी व उच्च विचारसरणी असल्याने धनगर समाजाचे आयडॉल बनतील. महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या संख्येने आहे. विधान परिषदेवर जनसंपर्क व कार्याच्या जोरावर भारतीय जनता पक्ष विचार करू शकतो ,अशी धारणा मित्रपरिवार व कार्यकर्त्यांची झालेली आहे. निश्चितपणे डॉ. आप्पासाहेब देशमुख यांचा भविष्यकाळ उज्वल असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांमधून दिली जात आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button