माढा लोकसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर तर, 02 कोटी 75 लाख माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत..

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीशजी महाजन यांच्याकडून माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भरघोस निधी मंजूर केला.
कोळेगाव येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या ज्ञानेश्वर मंदिरासमोर सभा मंडपासाठी 10 लाख रुपये मंजूर
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार गिरीशजी महाजन यांच्या ग्रामविकास विभागाअंतर्गत 2515-1238 या लेखा शीर्षका अंतर्गत 2023 -2024 या आर्थिक वर्षासाठी सातारा व सोलापूर जिल्ह्यातील माण, खटाव, करमाळा, माळशिरस, सांगोला, पंढरपूर आणि माढा तालुक्यातील विविध विकासकामांसाठी भरघोस असा निधी माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी मंजूर केलेला आहे. त्यापैकी माळशिरस तालुक्याच्या विविध विकासकामांसाठी 2 कोटी 75 लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे. तालुक्यातील कोळेगाव ग्रामस्थांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी होती. ज्ञानेश्वर मंदिरासमोर सभा मंडप व्हावा, यासाठी गावातील प्रतिष्ठित व सांप्रदायिक मंडळी यांनी फलटण येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन मागणी केलेली होती. ग्रामस्थांची मूळ खरी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व भागवत संप्रदाय यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथे दत्तू हांडे वस्ती ते मामा दाजी मोटेवस्ती रस्ता करणे 10 लाख रुपये आणि मोटे-रुपनवर वस्ती शाळा ते खरात वस्ती रस्ता सुधारणे 10 लाख रुपये, उंबरे (द.) येथे उंबरे-मेडद रस्ता जोडणारा पोपट सरगर वस्ती रस्ता सुधारणे 10 लाख रुपये, कण्हेर येथे एकमोरी ते बाजीराव माने वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते हरिदास माने वस्ती, जाधववस्ती रस्ता करणे 10 लाख रुपये, कोळगाव येथे ज्ञानेश्वर मंदिरासमोरील ग्रामपंचायत जागेमध्ये सभामंडप बांधणे 10 लाख रुपये, चौंडेश्वरवाडी येथे धनाजी साखळकर वस्ती बंदिस्त गटार करणे 10 लाख रुपये, दहिगाव येथे पी. के. सावंत वस्ती ग्रा. मा. 291 रस्ता सुधारणे 10 लाख रुपये आणि दहिगाव चाहूर वस्ती रस्ता करणे 10 लाख रुपये, धर्मपुरी येथे धर्मपुरी-शिंदेवाडी रस्ता ते सुदाम काटकर घर रस्ता करणे 10 लाख रुपये पिंपरी येथे खडकमाळ ते उंबरदेव रस्ता करणे 10 लाख रुपये, बचेरी येथे खरात वस्ती रस्ता (हदरनाईक) ते शंभर माने वस्ती रस्ता करणे 10 लाख रुपये, भांब येथे इजबाव रस्ता ते आगतराव सरगर शेत रस्ता सुधारणे 10 लाख रुपये, मळोली येथे मनोज फत्तेसिंह जाधव घर ते मेट रस्ता सुधारणे 10 लाख रुपये, महाळुंग-श्रीपूर येथे नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 5 येथे सांस्कृतिक भवन बांधणे 10 लाख रुपये आणि नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 12 येथे समाज मंदिर बांधणे 10 लाख रुपये, मांडवे येथे वार्ड क्रमांक 3 मध्ये करल वस्ती येथे रस्ता करणे 10 लाख रुपये, संगम येथे अंगणवाडी ते नरसिंहपुर रस्ता करणे 10 लाख रुपये, फळवणी येथे पीर मंदिरासमोर सुशोभीकरण व पेवर ब्लॉक बसवणे 10 लाख रुपये, पानीव येथे ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 110 पासून ते महालक्ष्मी मंदिराजवळून खुडूस शिवेपर्यंत चारीसह रस्ता करणे 20 लाख रुपये, माळीनगर येथे रमामाता कॉलनी येथे महिलांसाठी सार्वजनिक शौचालय 10 लाख रुपये आणि डोंबारी वसाहत येथे महिलांसाठी सार्वजनिक शौचालय 10 लाख रुपये, बोरगाव येथे श्री नाथ नगर अंतर्गत रस्ते काँक्रीट करणे 10 लाख रुपये आणि ईदगाह मैदान दुरुस्ती व संरक्षण भिंत बांधकाम 05 लाख रुपये, माळेवाडी (बोरगाव) येथे अंतर्गत रस्ते काँक्रीट करणे 10 लाख रुपये, जांभूड येथे अंतर्गत रस्ते काँक्रीट करणे 05 लाख रुपये, निमगाव येथे निमगाव-वेळापूर रस्ता ते बाळू तोरणे/जयसिंग मगर वस्ती रस्ता खडीकरण 05 लाख रुपये, तरंगफळ येथे माळशिरस-पिलीव रस्ता ते अक्षय कोडलकर वस्ती रस्ता खडीकरण 05 लाख रुपये, काळमवाडी येथे श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर ते शिंगोर्णी रस्ता खडीकरण 05 लाख रुपये, चांदापूरी येथे चांदापुरी-कुसमोड रस्ता ते तानाजी कोपनर/देविदास कोपनर वस्ती रस्ता खडीकरण 05 लाख रुपये, निमगाव येथे निमगाव मळोली-रस्ता ते यादव वस्ती ते कांतीलाल मगर वस्ती रस्ता खडीकरण 05 लाख रुपये, अशा विकासकामांना निधी मंजूर झालेला आहे.

उर्वरित गावांना अन्य योजनेतून विकासकामे मंजूर करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ग्रामविकास खात्याअंतर्गत मंजूर केलेल्या निधीचे तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.