मांडवे गावचे १५ वे सरपंच कोण होणार ?

मांडवे (बारामती झटका)
माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठी ग्रामपंचायत व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असणारी मांडवे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री. हनुमंत भीमराव टेळे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिलेला आहे. गेल्या महिन्यामध्ये सौ. स्वाती राजेंद्र शिंदे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड झाली आहे. आता १५ वे सरपंच कोण होणार ही उत्सुकता लागली असून सरपंच पदाची निवडणूक सुद्धा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
मांडवे ग्रामपंचायतीमध्ये श्री. हनुमंत भीमराव टेळे, सौ. स्वाती राजेंद्र शिंदे, सौ. शितल अर्जुन दुधाळ, सौ. स्वाती तानाजी दुधाळ, श्री. तात्याबा पांडुरंग शिंदे, श्री. सुरज दिनकर साळुंखे, सौ. बाळाबाई सुनील खुडे, श्री. विठ्ठल ज्ञानेश्वर पालवे, सौ. अश्विनी गजानन पालवे, सौ. हसीना रफिक मुलाणी, श्री. रितेश बबनराव पालवे, सौ. शोभा नाथा सिद, श्री. तानाजी जगन्नाथ पालवे, कु. पंचशीला रामचंद्र गायकवाड, सौ. मनीषा कुमार पाटील, सौ. आनंदीबाई शिवाजी ढोबळे, सौ. मालन बबन खोमणे असे १७ ग्रामपंचायत सदस्य आहेत. या सदस्यांपैकी १५ वे बिनविरोध सरपंच कोण होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून सर्व एकत्र येवून गावामध्ये विकासाच्या दृष्टीने विकासकामे चालू आहेत. त्यामुळे उपसरपंच पद जसे बिनविरोध झाले तसेच, सरपंच पद देखील बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.