ताज्या बातम्यासामाजिक

श्री कन्हेरसिद्ध बाबांच्या मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा पाचवा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन..

विश्वचैतन्य परमपूज्य श्री श्री श्री सद्गुरु नारायण (अण्णा) महाराज श्रीक्षेत्र नारायणपूर यांच्या आशीर्वादाने संपन्न होणार आहे.

विनोद भूषण वारकरी वैभव ह. भ. प. आदिनाथ महाराज लाड देवाची आळंदी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार.

कण्हेर (बारामती झटका)

कण्हेर ता. माळशिरस, या गावचे ग्रामदैवत श्री कन्हेरसिद्ध बाबांच्या मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा पाचवा वर्धापन दिन सोहळा विश्वचैतन्य परमपूज्य श्री श्री श्री सद्गुरू नारायण (अण्णा) महाराज, श्रीक्षेत्र नारायणपूर ता. पुरंदर, जि. पुणे, यांच्या आशीर्वादाने माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील ज्येष्ठ नेते गौतमआबा माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावचे थेट जनतेतील लोकनियुक्त सरपंच बाजीराव माने पाटील यांच्या नियोजनात व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्याने रविवार दि. 31/12/2023 रोजी संपन्न होणार आहे.

श्री कण्हेरसिद्ध बाबांच्या मंदिराचा कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा पाचवा वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि. 30/12/2023 रोजी सकाळी 10 ते 04 वाजेपर्यंत गजी ढोल खेळ होणार आहे. सायंकाळी 04 ते 07 महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. रात्री 08 ते 10 विनोद भूषण वारकरी वैभव ह. भ. प. आदिनाथ महाराज लाड, देवाची आळंदी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

रविवार दि. 31/12/2023 रोजी सकाळी 09 ते 11.30 मूर्तीवर रुद्राभिषेक, दुपारी 12.05 ते 01.30 होम हवन, दुपारी 02 नंतर महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.

तरी सर्व भाविकभक्तांनी कार्यक्रमास हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे समस्त ग्रामस्थ कण्हेर व ग्रामपंचायत कण्हेर यांच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
marsbahis hacklink market casibom