पिसेवाडी तंटामुक्त अध्यक्ष निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार यांची आक्रमक आंदोलन करण्याची भूमिका ठाम..

पिसेवाडी ( बारामती झटका)
पिसेवाडी ता. माळशिरस, या गावातील महात्मा गांधी तंटा मुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची निवड करावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष तथा पिसेवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य साहिल आतार यांनी आठ दिवसात तंटामुक्त समिती अध्यक्ष पदाची निवड करावी, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिलेला होता. त्याप्रमाणे साहिल आतार उद्या शुक्रवार दि. 5 जानेवारी 2024 रोजी आंदोलन करण्याची ठाम भूमिका घेऊन आंदोलन करण्यास आक्रमक झालेले आहेत.
ग्रामपंचायत सदस्य साहिल आतार यांनी ग्रामसेवक यांना दिलेल्या पत्रामध्ये अनेक मुद्दे नमूद केलेले आहेत. सदरच्या मुद्द्याच्या अनुषंगाने ग्रामसेवक यांनी साहिल आतार यांना लेखी उत्तर दिलेले आहे. ग्रामसेवक यांच्या उत्तरावर साहिल आतार समाधानी नसल्याने आंदोलनाची आक्रमक भूमिका घेतलेली आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोर सदस्य व ग्रामस्थ यांचे आंदोलन होणारच असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस विधानसभा अध्यक्ष तथा पिसेवाडी ग्रामपंचायत कर्तव्यदक्ष सदस्य साहिल आतार यांची ठाम भूमिका आहे.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.