Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

चर्चा तर होणारच… महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे पदाधिकारी यांच्यात फिल्मी स्टाईलने खुर्च्याने हाणामारी..

सभागृहाच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी हॉटेलमध्ये प्रकार घडलेला असून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप, कोणाला काही सांगायचं नाही’, असे झाले पण बाजारात गुपचूप गुपचूप चर्चा सुरू.

महाळुंग (बारामती झटका)

महाळुंग ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये झाले. नगरपंचायत मधील 17 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यापैकी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व विविध विषयांचे सभापती अशा सर्वांना पदाधिकारी समजले जाते.

महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीचे पदाधिकारी यांच्यात फिल्मी स्टाईलने हमरीतुमरी वरून एकमेकांना खुर्च्याने हाणामारी झाली. सदरची हाणामारी सभागृहाच्या बाहेर सार्वजनिक ठिकाणी हॉटेलमध्ये झालेली आहे. सदरच्या प्रकाराबाबत तक्रार दाखल झालेली नाही. ‘तेरीभी चुप मेरीभी चूप, कोणाला काही सांगायचं नाही’, असे पदाधिकारी यांच्यात व समर्थकांमध्ये झालेले असावे. परंतु, झालेल्या प्रकाराची कानोकानी दोन दिवस चर्चा होऊन बोरगावच्या बाजारात गुपचूप गुपचूप दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

सभागृहातील जबाबदार पदाधिकारी यांच्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी हॉटेलमध्ये हाणामारी होण्याचे निश्चित काय कारण असावे, याबाबत महाळुंग-श्रीपुर पंचक्रोशीमध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे. सदरचा वाद कोणत्या मुद्द्यावरून विकोपाला गेला.

तसं पाहिलं तर सभागृहामध्ये असे वादविवाद सुरू असतात. परंतु, हॉटेलमध्ये पदाधिकारी यांच्यात वादविवाद झाले. सार्वजनिक ठिकाणामुळे उलट सुलट चर्चा सुरू आहे. बातमी वाऱ्यासारखी कानोकानी पसरली. सदरच्या फिल्मी हाणामारीचे बोरगावच्या बाजारात गुपचूप गुपचूप चर्चा सुरू झाली आहे. सदरचा वाद आपापसांत मिटणार का ?, वादविवाद वाढणार ?, याकडे महाळुंग-श्रीपुरच्या नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button