शिर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिर मेळाव्यात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग..

शिर्डी (बारामती झटका)
देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार, आमदार, पदाधिकारी यांचे शिर्डी येथे मेळावा शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. सदरच्या शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना चेअरमन प्रतीक जयवंतराव पाटील, क्रांती शुगर कुंडलचे चेअरमन शरद अरुणअण्णा लाड, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राष्ट्रवादीचे नेते विशालभैया कदम, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व सातारा जिल्हा प्रभारी संकल्पभैय्या हनुमंतराव डोळस यांच्यासह अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर पहिलेच शिबिर असल्याने राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेले होते. या शिबिराला माजी मंत्री, खासदार, आमदार, राष्ट्रीय व राज्य कार्यकारणी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्यावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी जोमाने काम करण्याचा संकल्प मेळाव्यामध्ये करण्यात आला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.