वेळापूर येथे ‘राधाकृष्ण हॉस्पिटल’ चा शुभारंभ मोठ्या थाटामाटात व दिमाखात संपन्न होणार..

प्रशस्त व अत्याधुनिक सोयींनीयुक्त हॉस्पिटलचा शुभारंभ व स्नेहभोजनास उपस्थित राहण्याचे पवार परिवार यांचे आग्रहाचे निमंत्रण.
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस, येथील राधाकृष्ण हॉस्पिटल, पालखी चौक, अकलूज रोड येथे सोमवार दि. ०८/०१/२०२४ रोजी प्रशस्त व अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा हॉस्पिटलचा शुभारंभ होत आहे. तरी, मित्रपरिवार, नातेवाईक यांनी तीर्थप्रसाद व स्नेहभोजनास उपस्थित राहण्याचे सौ. राधिका व श्री. कृष्णा महादेव पवार, सौ. सारिका व श्री. सुधीर कृष्णा पवार, सौ. डॉक्टर प्रीती व श्री. डॉक्टर सागर कृष्णा पवार आणि समस्त पवार परिवार यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
राधाकृष्ण हॉस्पिटल प्रशस्त व अत्याधुनिक सोयींनीयुक्त अशा हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर व प्रसूती गृह, सर्व सोयींनीयुक्त बाळंतपणांसाठी सुविधा, स्त्री रोग चिकित्सा व उपचार, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेची सोय, हर्निया, अपेंडिक्स, गर्भपिशवी काढणे व इतर शस्त्रक्रिया करण्याच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.


तीर्थप्रसाद व स्नेह भोजनास सायंकाळी पाच वाजलेपासून आपल्या आगमनापर्यंत पवार परिवार वाट पाहत आहे. तरी आपण उपस्थित राहावे. आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे सौ. डॉ. प्रीती (B.H.M.S.P.G.DE.M.S. स्त्री रोग तज्ञ ) व श्री. डॉक्टर सागर कृष्णा पवार ( M.S. प्रसूती तज्ञ व स्त्री रोग तज्ञ) यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे. भेटवस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत, आपली उपस्थिती हीच अनमोल भेट अशा प्रकारे टीप टाकलेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.