इंदापुरात पत्रकार भवनाची देखणी इमारत बांधूनच देणार – आ. दत्तात्रय भरणे

तालुक्यातील विकासाच्या भागीदारांना पुरस्कार देऊन सन्मानित
महिला सफाई कामगार आरोग्य विभागाच्या कर्मचारी भगिनी यांचा पैठणी देऊन सन्मान
इंदापूर (बारामती झटका)
इंदापूर तालुका शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी, दुःखाच्या काळामध्ये, कोरोनाच्या संकटात, इंदापूर तालुक्यामध्ये १४ हजार कुटुंबांना अन्नधान्य पुरवून आधार देण्याची भूमिका घेतली. इतकी मदत राज्यामध्ये कोणत्याही पत्रकार संघाने जनतेला केली नाही. ती मदत इंदापुरात झाली. गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा पत्रकार संघाने मानली आहे. म्हणूनच जे बोलतो ते करतो. त्यामुळे शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनची इमारत देखणी बांधूनच देणार असा शब्द आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिला.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका व शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर येथे पत्रकार दिन सोहळ्यानिमित्त राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तालुक्यातील विकासाचे भागीदार यांना पुरस्कार प्रदान सोहळा तसेच महिला सफाई कामगार व आरोग्य कर्मचारी भगिनी यांचा पैठणी देऊन सन्मान व पत्रकारांचा सन्मान सोहळा (ता. ६ जानेवारी) शनिवारी पार पडला. यावेळी माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, श्रीमंत ढोले, प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हनुमंत कोकाटे, शरद पवार गटाचे अध्यक्ष तेजसिंह पाटील, माजी सभापती मयूरसिंह पाटील, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांच्यासह सामाजिक राजकीय, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार संघाचा तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते व सचिव सागर शिंदे यांनी उपस्थितांचा सन्मान केला.
पुढे बोलताना आमदार भरणे म्हणाले की, पत्रकार संघाच्या माध्यमातून गरीब भगिनींचा पैठणी सन्मान करण्याची परंपरा जपली आहे. जी अहोरात्र जनतेसाठी कष्ट करतात त्यांना मानसन्मान देण्याची भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे. याचा मला आनंद वाटतो. पुरस्कार देऊन तालुक्यातील विकासाच्या भागीदारांना गौरवले त्यामुळे त्यांची आणखी जबाबदारी वाढली आहे. आता दुप्पट वेगाने आपापल्या क्षेत्रामध्ये काम करायचे आहे, असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की,इंदापूर भूषण म्हणून गौरवलेले भरत शहा, आदर्श सरपंच म्हणून चित्रलेखा ढोले, सहकाररत्न वसंतराव मोहोळकर, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, उद्योजक संजय दोशी, अमोल करे, आदर्श शिक्षक ज्ञानदेव चव्हाण, आदर्श वैद्यकीय वैद्यकीय सेवा डॉ. सुरेखा पोळ यांच्यासह सर्व पुरस्कार्ती हे खऱ्या अर्थाने अभिनंदनास पात्र आहेत. राजकारण समाजकारण अर्थकारण खऱ्या अर्थाने मीडियाच्या माध्यमातून राज्याला देशाला कळते आहे.
पत्रकारांना विम्याचे संरक्षण देणे पत्रकार भवन उभारणे हे महत्त्वाचे आहे. जिथे जिथे आम्हाला सहकार्य करता येईल. तिथे आम्ही मनापासून सहकार्य करू, पत्रकारितेला सन्मान देणे आणि संरक्षण देणेही भूमिका सर्वांनी घेणे गरजेचे आहे. कोविड काळात जनतेला मदत वृक्षारोपणाचा उपक्रम, पत्रकार संघाने यशस्वी राबवला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील त्यांच्याशी ऋणानुबंध इंदापूर तालुक्याचे जुनेच असल्यामुळे पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात. पत्रकार संघाच्या जागेच्या प्रश्नासाठी जी मदत लागेल ती दिली जाईल. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भूमिपूजनासाठी आणले जाईल असा शब्दही हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांनी केले तर आभार सचिव सागर शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन निलेश धापते केले. पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संदीप सुतार,खजिनदार भीमराव आरडे, गोकुळ टांगसाळे, बाळासाहेब कवळे, उदयसिंह जाधव देशमुख, सुरेश मिसाळ, प्रेमकुमार धर्माधिकारी, अमोल रजपुत, नितिन चितळकर, दिपक शिंदे, राजेंद्र कवडे देशमुख, संतोष दहिदुले, बाळासाहेब धवडे, तात्याराव पवार, इम्तियाज मुलाणी, लक्ष्मण भिसे, उमाकांत तोरणे, भारत शेंडगे, श्रेयश नलवडे, नानासाहेब लोंढे, निलेश भोंग, गणेश कांबळे, आकाश भोसले, बाळासाहेब जामदार, आबा राउत, राजेंद्र भोसले, मिलिंद मखरे यांच्यासह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.