वाघोली ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदी सौ. छाया पाटोळे यांची बिनविरोध निवड
वाघोली (बारामती झटका)
वाघोली ता. माळशिरस येथील ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंच पदी सौ. छाया भारत पाटोळे यांची बिनविरोध निवड झाली. सदरची निवड निवडणूक अधिकारी गिरमे भाऊसो, वाघोलीचे तलाठी आल्लेवार भाऊसो व ग्रामसेवक रोडे भाऊसो यांच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी उपसरपंच पंडित विठ्ठल मिसाळ, माजी सरपंच वृषाली योगेश माने, योगेश दिगांबर माने, सुजाता बळीराम मिसाळ, रोहिणी अमोल मिसाळ, लक्ष्मण दत्तू पारसे, अविनाथ बाबू गाडे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर विष्णू मिसाळ, कालिदास मिसाळ, हरिदास चव्हाण, उत्तमराव माने, विठ्ठल पाटील, विलास मिसाळ, श्रीमंत चव्हाण, हरिदास पाटोळे, मारुती मिसाळ, बिभीषण मिसाळ, मोहन शेंडगे, मधुकर चव्हाण, प्रभाकर मिसाळ, अधिक पवार, दिगंबर माने, रवींद्र मिसाळ, अनंत मिसाळ, राजेंद्र पताळे, दत्तात्रय मिसाळ, पोपट पाटील, निलेश शेंडगे, प्रवीण पाटील, गणेश शेंडगे, सतीश मिसाळ, दिगांबर दुपडे, तात्यासो पवार, श्रीकांत पाटोळे, बाळासो पाटील, संतोष पवार, सुनील माने, मारुती पाटोळे, कुंडलिक मिसाळ, दत्तात्रय साळुंखे, एकनाथ निकम, बंडू पाटील, गणित मुलाणी, दीपक निकम, विवेक चव्हाण, दिगंबर दुपडे, तानाजी मिसाळ, रामदास कांबळे, सुरेश व्यवहारे, दत्ता गाडे, सचिन मिसाळ, बबन साळुंखे, सचिन पताळे, मसा कांबळे, हनुमंत भानवसे, अक्षय पाटील, गणेश पाटोळे, तुकाराम मिसाळ, लालासो मुलाणी, रेवण पवार, प्रवीण मिसाळ, परमेश्वर माशाळ, संकेत चौधरी, सोमनाथ पारसे, कुंडलिक जाधव, आप्पा पाटील, संतोष जाधव, नवनाथ चव्हाण, समाधान केंगार आदी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते.
सदरची निवडणूक पार पाडण्यासाठी सरपंच प्रतिनिधी भारत पाटोळे, युवा नेते बळीराम मिसाळ, अमोल मिसाळ, ग्रामपंचायत कर्मचारी मल्हारी जाधव, दादा गायकवाड, बलभीम ओहोळ, मारुती मिसाळ यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पारसे यांनी केले. तर आभार प्रदर्शन युवा उद्योजक युवा नेते तुषार पाटोळे यांनी केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Insightful read! I found your perspective very engaging. For more information, visit: READ MORE. Eager to see what others have to say!
Ищите в гугле