सद्गुरु श्री श्री साखर कारखान्यावरती मा. चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्ताने घेतलेल्या रक्तदानाने केला उच्चांक

पिलीव (बारामती झटका) रघुनाथ देवकर यांजकडून
सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या व सद्गुरु श्री श्री रविशंकरजी तथा गुरुजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजेवाडी नगरीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि बेरोजगार कष्टकरी यांच्या हाताला काम, कामाला दाम या उद्देशाने गेल्या बारा वर्षापासून सद्गुरु श्री श्री रविशंकर साखर कारखाना श्री श्रीनगर या कारखान्याची निर्मिती झाली. आणि अल्पावधीतच असंख्य शेतकऱ्यांच्या व या भागातील सर्वसमावेशक घटकांच्या जीवनाला वरदान ठरवून विश्वासास पात्र राहिलेल्या या कारखान्याच्या मा. सर्व संचालक मंडळ यांच्या निस्वार्थी व समाजसेवेच्या उद्देशाने राबवित असलेल्या उपक्रमामुळे सद्गुरु श्री श्री साखर कारखाना हा एक सामाजिक बांधिलकीचं प्रतिक ठरलेला आहे. अशा या कारखान्याचे मा. चेअरमन एन. शेषागिरीराव व व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील यांच्या संयुक्त वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व संचालक मंडळ व सद्गुरु परिवाराच्या वतीने कारखाना स्थळावर रक्तदान शिबिर, टी.टी. चे लसीकरण व आरोग्याच्या इतर तपासण्या अशा प्रकारचे आरोग्यदायी व नाविन्यपूर्ण शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराच्या प्रारंभी कारखान्याचे संचालक व मॅनेजर रामाराव, सर्व अधिकारी, पदाधिकारी, खाते प्रमुख, कर्मचारी, कामगार यांचे समवेत सद्गुरु श्री श्री रविशंकरजी तथा गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले व शिबिरांना सुरुवात करण्यात आली. इतर खर्चाला फाटा देऊन आरोग्याच्या बाबतीत प्राधान्य असलेल्या या उपक्रमात बहुसंख्य लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. त्यानंतर सांगली आर.टी.ओ. कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सर्व वाहन, चालक, मालक यांना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून अपघात टाळण्याबाबतचे उपाय सांगून नियमावली समजावून सांगितली व पत्रकार दिनाचे औचित्य साधून सद्गुरू परिवारातर्फे उपस्थित पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्ती एन/ शेषागिरीराव व बाळासाहेब कर्णवर पाटील यांचा उपस्थित राहिलेल्या सांगली, सातारा, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील असंख्य सभासद बांधव, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व संघटनांचे पदाधिकारी यांनी पुष्पहार, गुच्छ, शाल, फेटा देऊन वाढदिवसानिमित्त पेढा भरवुन महिला कामगार प्रतिनिधी सौ. अश्विनी तेली मॅडम यांचे करवी औक्षण केले. व दीर्घायुष्य लाभण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक उदय जाधव व अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली.


सत्कारमूर्ती मा. शेषागिरीराव व मा. बाळासाहेब कर्णवर पाटील यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले की, या सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याची निर्मितीच समाजसेवेसाठी केलेली आहे. शेतकऱ्याला मानबिंदू मानून आमचे सर्व संचालक मंडळ यापूर्वीही कार्य करीत होते, आजही करीत आहे व भविष्यातही करीत राहणार आहे, अशी ग्वाही दिली. यावेळी सूत्रसंचालन केन मॅनेजर सुनील सावंत यांनी केले तर आभार एच. आर. ॲडमिन सचिन खटके यांनी मानले. यावेळी सर्व उपस्थितांना स्नेहभोजन देण्यात आले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.