वेळापुरात प्रशस्त क्रिडा संकुल व पत्रकार भवन होणे गरजचे – काकासाहेब जाधव

वेळापूर येथे राजमाता जिजाऊ जयंती, पत्रकार दिन व विद्यार्थी खेळाडू सन्मान सोहळा संपन्न
वेळापूर (बारामती झटका)
वेळापुर हे माळशिरस तालुक्याचे केंद्र बनत असुन वेळापूरचे खेळाडू गावाचे नाव देशपातळीवर गाजवत आहेत. परंतु दुर्भाग्य असे आहे, की वेळापुरच्या खेळाडूंना सरावासाठी प्रशस्त क्रिडा संकुल नाही. त्यामुळे वेळापुरला प्रशस्त क्रिडा संकुल व पत्रकार भवन झाले पाहीजे, असे प्रतिपादन वेळापूर येथे बहुजन मुक्ती पार्टी आयोजित राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती तसेच पत्रकार दिन व विद्यार्थी खेळाडू सन्मान सोहळा प्रसंगी काकासाहेब जाधव प्रवक्ता बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य, यांनी केले.
ते पुढे म्हणाले, की सध्याची परिस्थिती खूप वेगळी आहे. समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कसं जगायचं, हे शिक्षण शिकवलं गेलं पाहिजे. ते शिक्षण अंमलात आणलं गेलं पाहिजे. लिहिता वाचता आलं म्हणजे शिक्षण झालं असं नाही. कारण सध्या परिस्थिती बदलते आणि बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षणाची पद्धतही बदलली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

वेळापूर येथील रामोशी गल्ली गणपती मंदिरासमोर बहुजन मुक्ती पार्टी यांच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या संयुक्त जयंती निमित्त तसेच पत्रकार दिन व विद्यार्थी खेळाडू सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याप्रसंगी वेळापूर पोलीस ठाण्याचे निलेश बागाव सहाय्यक पोलीस निरीक्षक, बाळासाहेब धाईंजे माजी जि.प.सदस्य, महादेव (भाऊ) ताटे समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष, मिलिंद सरतापे ता. अध्यक्ष आरपीआय, गणेश (तात्या) चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य, मल्हारी बनकर माजी उपसरपंच वेळापूर, युवराज मंडले अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती वेळापूर, सौ. अश्विनीताई भानवसे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर, विनायक (बाबा) चंदनशिवे, डॉ. धनंजय म्हेत्रे, राजाभाऊ जाधव तालुका अध्यक्ष कैकाडी समाज संघटना, लखन (तात्या) मंडले, मैनुद्दीन दरवेशी, महेश साठे, विनायक भगत अध्यक्ष श्री संत रोहिदास बहुउद्देशीय सामाजिक संस्था, महिंद्र साठे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माहिती सेवाभावी संस्था, सुनील साठे, अशोक जाधव, शाहीर मुलाणी, प्रदीप सरवदे तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, रणजीत साठे सर, महादेव नाईकनवरे, संभाजी जाधव, बाबू चव्हाण अध्यक्ष छत्रपती क्रांती सेना वेळापूर, अमजद शेख माजी ग्रामपंचायत सदस्य, संजय पनासे, बापूसाहेब आडत, रिकेश चव्हाण खंडाळी ग्रामपंचायत सदस्य, राहुल गायकवाड ता. सचिव बहुजन मुक्ती पार्टी माळशिरस, शिवाजी मोहिते अध्यक्ष समता परिषद वेळापूर, नाथाजी मोहिते, अजित बनकर, सुखदेव आडत, राहुल सराटे तालुकाध्यक्ष राष्ट्रीय नाभिक संघटना, शहराध्यक्ष प्रमोद साळुंखे, विठ्ठल माने, पिनू लोखंडे, लालासो गेजगे, संजय वाघमोडे मित्र प्रतिष्ठान, भैय्या कोडग, सिकंदर कोरबू , मच्छिंद्र जाधव आदींसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, त्यांचे पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने वेळापूर परिसरातील इंग्लिश स्कूल वेळापूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय वेळापूर, लोकविकास विद्यालय वेळापूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळापूर मुली, पिसेवाडी आदी शाळांतील विद्यार्थी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच वेळापूर परिसरातील पत्रकार बांधवांचाही सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन काकासाहेब जाधव मित्रपरिवार व टायसन ग्रुप यांच्यावतीने करण्यात आले होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पिनू (भाऊ) येडगे, शाम (भाऊ) मंडले, नागेश वाघमारे, समाधान मंडले, अनंत मंडले, सौरभ वाघमारे, आबासाहेब वाघमारे, सोमनाथ मारकड, अजित माने, दिलीप बोडरे, बापू साठे, दादा मंडले (घुमेरा), धनाजी वाघ, बालम दरवेशी, गणेश मंडले, सुरेश मंडले, नारायण सर्वगोड, तेजस सकट, कमलेश कसबे, विजय जाधव, अक्षय जाधव, संजय शेंडगे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालम दरवेशी यांनी केले तर, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिनू (भाऊ) येडगे यांनी केले आणि आभार पत्रकार अमोल साठे यांनी मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.