माळशिरस येथे मकर संक्रातीनिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

होम मिनिस्टर खेळातून कोणती महिला स्कूटीवरून घरी जाणार….
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस येथे मकर संक्रांतीनिमित्त महिलांच्या सन्मानासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाअंतर्गत भव्य हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन तुकाराम भाऊ देशमुख व सचिन आप्पा वावरे यांच्यावतीने रविवार दि. २१/१/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता अक्षता मंगल कार्यालय, ६१ फाटा अकलूज रोड, माळशिरस येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांमध्ये खास महिलांसाठी होम मिनिस्टर अंतर्गत खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा यामध्ये गप्पागोष्टी, रंजक खेळ, हिंदी, मराठी गाणी, त्याच्यासोबत गावरान कॉमेडीचा तडका याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांमध्ये आकर्षक बक्षिसे देखील आहेत. विजेत्या सात महिलांसाठी मानाच्या पैठणी देण्यात येणार आहे. तसेच कै. ज्ञानदेव देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री. महादेव तात्या देशमुख गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून प्रथम क्रमांक एक्टिवा, कै. सदाशिव व कै. विलास मारुती देशमुख यांच्या स्मरणार्थ श्री. अशोक उत्तम देशमुख यांच्याकडून द्वितीय क्रमांक वॉशिंग मशीन, श्री. अगतराव मारुती देशमुख प्रगतशील बागातदार यांच्याकडून तृतीय क्रमांक एलईडी टीव्ही, कै. विष्णुपंत टेळे यांच्या स्मरणार्थ श्री. सचिन महादेव टेळे युवा नेते, उद्योजक यांच्याकडून चतुर्थ क्रमांक रेफ्रिजरेटर, ॲड. श्री दादासाहेब कोळेकर यांच्याकडून पाचवा क्रमांक पिठाची गिरणी, श्री. सर्जेराव शामराव जानकर माजी उपसरपंच, माळशिरस ग्रामपंचायत यांच्याकडून सहावा क्रमांक कुलर, श्री. राजेंद्र तुळशीराम टेळे थोर विचारवंत यांच्याकडून सातवा क्रमांक ओव्हन अशी बक्षिसे असणार आहेत. तसेच २१ उत्तेजनार्थ महिलांना देखील पैठणी देण्यात येणार आहे. तसेच 21 लकी ड्रॉ विजेत्यास मिक्सर भेट देण्यात येणार आहे.
तरी या भव्य हळदी कुंकू कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सौ. वैशाली तुकाराम देशमुख, सौ. ताई सचिन वावरे, सौ. सुनीता दादासाहेब देशमुख, सौ. दिपाली हनुमंत देशमुख, सौ. सारिका महेश वावरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.