मांडवे ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत सदस्य युवा नेते रितेश भैया पालवे यांचे शेतकरी बांधवांना आवाहन

मांडवे (बारामती झटका)
मौजे मांडवे ता. माळशिरस, येथील सर्व शेतकरी खातेदारांना कळविण्यात येते की, सन 2023 खरीप हंगामात दुष्काळामुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीबाबत अनुदानासाठी शासनाकडून माहिती मागवण्यात आली आहे. तरी मांडवे येथील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकाच्या झालेल्या नुकसानीची माहिती सोबत जोडलेल्या अर्जामध्ये नमूद करून तलाठी कार्यालय येथे गुरुवार पर्यंत सादर करावी. अर्जासोबत सर्व शेतकऱ्यांनी बँक पासबुक झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स व मोबाईल क्रमांक सादर करावे.

सदर अनुदानासाठी खालील अटी आवश्यक आहेत –
१) खातेदाराचे जर सामायिक क्षेत्र असेल तर एका नावावर अनुदान जमा करणे बाबत इतर सर्व सामाईकातील खातेदारांचे संमती पत्र आवश्यक आहे.
2) नुकसान झालेल्या पिकाची नोंद सातबारावर पिक पाहणीमध्ये असणे आवश्यक आहे.
तरी ज्या खातेदारांच्या पिकाच्या नोंदी सातबारावर पीक पाहणीमध्ये नाहीत, त्यांनी त्या ई-पीक पाहणी ॲप मधून तात्काळ करून घ्याव्यात. कारण पिकाच्या नोंदी सातबारावर नसतील तर त्यांना अनुदानाचा लाभ मिळणार नाही. तरी सर्व शेतकऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांबाबत सोबत जोडलेल्या अर्जात माहिती भरून गुरुवारपर्यंत तलाठी कार्यालयात अर्ज सादर करावेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.