माळशिरस येथे रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागाचे सादरीकरण

पानीव (बारामती झटका)
पानीव ता. माळशिरस येथील श्रीराम कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांनी माळशिरस येथे श्रीनाथ महाविद्यालय मध्ये रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण सहभागी मूल्यांकन सादर करण्यात आले. रांगोळीद्वारे रेखाटलेल्या आराखड्यामध्ये माळशिरस गावातील उपलब्ध नैसर्गिक साधन, वन स्त्रोत, जलस्त्रोत, पीक लागवड क्षेत्र, फळबागा, नगरपंचायत, शाळा, विविध रस्ते तसेच गावातील प्रमुख ठिकाणे दाखवण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे नियोजन कृषी कन्या पवार वैष्णवी, दगडे प्रणिता, पोरे श्वेता, भोसले साक्षी, राऊत मेघा यांनी केले.

यावेळी माळशिरस तालुक्याचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख, माजी सरपंच विकास दादा संदिपान महादेव माने, गणपतराव वाघमोडे, महेश बोथरे, हसन मुलाणी, बाबासाहेब माने, नामदेव कोळेकर, ताई वावरे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. एच. डी. हाके आणि डॉ. जे. आय. शेख यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.