माळशिरस वकिल बांधवांच्या वतीने आयोजित केलेल्या जागर संविधानाचा राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

माळशिरस (बारामती झटका)
दि. 6 डिसेंबर 2023 ते दि. 20 जानेवारी 2024 या दरम्यान पार पडलेल्या माळशिरस वकिल बांधवांनी आयोजित केलेला जागर संविधानाचा राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा 2023 या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल दि. 26 जानेवारी 2024 रोजी अकलूज येथिऊल लक्ष्मी बालाजी हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर वक्तृत्व स्पर्धा ही ऑनलाइनद्वारे पार पडली. यामध्ये 35 स्पर्धकांनी भाग घेतला होता. महाराष्ट्रातील अमरावती, धाराशिव, अहमदनगर, सातारा, सोलापूर, पुणे, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई भागातील स्पर्धक सहभागी झाले होते.

सदर स्पर्धेमध्ये क्रमांक पटकविलेल्या स्पर्धकांना पारितोषिक सोपानराव निकम निवृत जिल्हा न्यायाधीश तथा डायरेक्टर ऑफ प्रोसेक्युशन यांचे हस्ते आणि सरकारी वकील महेश कोळेकर, आक्काताई बडरे, प्रमोद शिंदे, संपादक पुरोगामी महाराष्ट्र न्यूज चॅनल, शंकर बागडे, हेड, स्मायल एफएम अकलूज, आणि ॲड. नागनाथ शिंदे, अध्यक्ष, माळशिरस वकिल संघटना यांच्या उपस्थितीत देण्यात आले. सदर स्पर्धेची रूपरेषा आणि संकल्पना प्रास्ताविकेच्या माध्यमातून ॲड. सुमित सावंत यांनी मांडली.
प्रथम क्रमांक सुचित्रा कांबळे, गोरेगाव, मुंबई, यांना मिळाला असून 11,111/- रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक प्रगती गेंड भांबुर्डी, माळशिरस यांना 7,777/- रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक ॲड. अल्ताफ आतार, अकलूज यांना रक्कम रुपये 5,555/-, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह तसेच दोन उतेजनार्थ पारितोषिक हर्षद पुडेगे, सोलापूर आणि आदित्य विलांकर, डोंबिवली, मुंबई यांना प्रत्येकी रक्कम रुपये 3000, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह असे देण्यात आले आहेत. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे. स्पर्धेचे ज्युरी म्हणून प्रा. देविदास गेजगे यांनी काम पाहिले.

या कार्यक्रमास समाजातील अनेक मान्यवर वकिल मंडळी, समाजसेवक, विविध राजकीय पक्षांतील मान्यवर आणि बहुसंख्य लोक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड. रजनी गाडे, ॲड. सुनिता सातपुते, ॲड. वैशाली कांबळे, ॲड. धनंजय बाबर, ॲड. भारत गोरवे, ॲड. सुमित सावंत, ॲड. वैभव धाईंजे, ॲड. अजिंक्य नवगिरे, ॲड. सुयश सावंत, ॲड. नितीन भोसले, ॲड. धैर्यशिल भोसले, ॲड. मनोज धाईंजे यांनी प्रयत्न केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.