उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष राहुल सावंत यांची निवड…

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक यांची तालुकाध्यक्षपदी निवड…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका अध्यक्षपदी दहिगाव गावचे युवा नेते राहुल अरुण सावंत यांची निवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक अशोक आव्हाड यांनी जाहीर केली आहे.
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचे खंदे समर्थक असणारे राहुल सावंत यांची माळशिरस तालुका अध्यक्षपदी निवड झालेली आहे. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सावंत परिवार यांचा राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठा सहभाग असतो. सावंत परिवारामधील सदस्यांनी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य पदावर काम केलेले आहे.

माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात सावंत परिवार यांचे राजकीय वर्चस्व आहे. भविष्यात राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची टिकटिक वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माळशिरस तालुका अध्यक्षपदी माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांची निवड केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्षपदी राहुल सावंत यांची निवड केलेली असल्याने मराठा व धनगर समाज एकत्र आणलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.