त्रिमूर्ती केसरी पैलवान दत्ता मगर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदी निवड..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
वेळापूर (बारामती झटका)
माजी केंद्रीय कृषिमंत्री देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या उपस्थितीत वेळापूर येथील इंद्रनील मंगल कार्यालय येथे विजय निश्चित मेळावा आयोजित केलेला होता. सदरच्या मेळाव्यामध्ये त्रिमूर्ती केसरी पैलवान दत्ता मगर उर्फ दत्तू नाना यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करून प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील यांनी सन्मान केला. यावेळी माळशिरस तालुक्यातील राज्य कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी व तालुका कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतंत्र गट निर्माण केल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले होते. मेळाव्याच्या अनुषंगाने तालुक्यातील शरदचंद्रजी पवार यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निमगाव मगराचे गावचे थोर सुपुत्र दत्तू नाना मगर यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेले आहे. तळागाळापर्यंत शरदचंद्रजी पवार यांचे विचार पोहोचविण्याचे काम केलेले आहे. संघटन कौशल्य व वक्तृत्व असल्याने दत्तू नाना मगर यांच्याकडे उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये शरदचंद्रजी पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक युवक सहभागी झालेले आहेत. दत्तू नाना मगर यांचा दांडगा जनसंपर्क आहे.
भविष्यात निमगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे सदस्य निवडून येण्यासाठी दत्तू नाना यांची मोलाची साथ राहणार आहे. दत्तू नाना मगर यांच्या निवडीने निमगाव मगराचे व निमगाव पंचक्रोशीत कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
https://www.youtube.com/live/9ULTn_87poc?si=-f9WwhsAWQRqDeWm