….. अखेर फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात, प्रस्तावित नवीन मार्गावर बोर्ड लागले…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाला यश आले.
माळशिरस (बारामती झटका)
इंग्रजांच्या काळापासून प्रलंबित असलेली लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे होते की नाही, असा प्रश्न फलटण, माळशिरस, पंढरपूर तालुक्यासह भागवत सांप्रदायातील वैष्णव व भाविक भक्तांना पडलेला होता. माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सततचा प्रयत्न करून गेल्या अर्थसंकल्पामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे सततचा पाठपुरावा करून प्रस्तावित मार्गासाठी 20 कोटी रुपये निधी मंजूर करून घेतलेला होता.
लोणंदपासून फलटणपर्यंत रेल्वे मार्ग करून घेतलेला होता. मात्र, त्या मार्गाला फलटणवरून पंढरपूरकडे नेणे गरजेचे होते, यासाठी प्रयत्न सुरू होते. रेल्वे अधिकारी यांच्याशी बैठका सुरू होत्या. फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग होणे गरजेचे होते. अखेर, फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झालेली असून प्रस्तावित नवीन मार्गावर बोर्ड लागलेले असल्याने फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचा प्रश्न लोकप्रिय कार्यतत्पर पाणीदार खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांना खऱ्या अर्थाने श्रेय जात आहे.
फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर पंढरपूर तीर्थक्षेत्रावरून अनेक ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या ब्रॉडगेज रेल्वे गाड्या यांच्यामधून प्रवाशांना व भाविकांना प्रवास करणे सुखकर होणार आहे. माळशिरस तालुक्यातून सदरच्या रेल्वे मार्ग जात असल्याने माळशिरस तालुक्याच्या आर्थिक सुबत्तेमध्ये वाढ होणार आहे. रेल्वे मार्गामुळे व्यापार पेठ, शिक्षण, शेतीमाल विक्रीसाठी फायदा होणार आहे. अशा अनेक गोष्टींचा फायदा माळशिरस तालुक्याला होत असल्याने निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांनी प्रचाराच्या वेळी सिंचन रेल्वे, रस्ते असे अनेक विकासकामे व जनहिताच्या निर्णयाचे भाषणामध्ये सांगून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मताने विजयी करा, असे आवाहन केलेले होते.
पंतप्रधान व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या आव्हानाला साथ देत माळशिरस तालुक्याने एक लाखापेक्षा जास्त लीड दिलेले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग, श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग, निरा-देवधर रखडलेला प्रकल्प, फलटण-पंढरपूर रेल्वे असे अनेक प्रश्न निकाली काढलेले असल्याने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना दिलेले मत खऱ्या अर्थाने उपयोगी आले असल्याची भावना माळशिरस तालुक्यातील मतदारांमधून बोलली जात आहे.
लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी बारामती झटका साप्ताहिक, बारामती झटका वेब पोर्टल, बारामती झटका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी रखडलेला प्रकल्प व्हावा यासाठी वार्तांकन केलेले होते. यामुळे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस, महाविजय संयोजन आमदार श्रीकांतजी भारतीय व माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी संपादक श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मु पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर, यांची शिफारस करून केंद्रीय रेल्वे विभागाच्या महाराष्ट्र राज्याच्या रेल्वे सल्लागार समितीवर निवड करण्यात आलेली आहे. योगायोगाने रखडलेल्या फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू होत असल्याने पायगुणसुद्धा महत्त्वाचा समजला जातो आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



