माढा लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचा माढा विजय निर्धार मेळावा माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या उपस्थिती होणार संपन्न..

फलटण (बारामती झटका)
माढा लोकसभा मतदार संघाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा माढा विजय निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रीय समाज पक्षाचे सरसेनापती महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्ध विकास व पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दि. १७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी १ वा. अनंत मंगल कार्यालय फलटण येथे करण्यात आले आहे.

माढा लोकसभा मतदार संघातील सर्व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व कार्यकर्ते कामाला लागले आहे. यावेळेला माढा लोकसभा मतदार संघामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष निवडणूक लढविण्याची चिन्हे दिसत असून मोट बांधणीचे काम सुरु आहे. त्यामुळे या भव्य माढा विजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.