उपजिल्हाधिकारी गंगाधर होवाळे यांचा नागरी सत्कार माळशिरस पदवीधर मित्र परिवाराच्या वतीने साजरा

माळशिरस (बारामती झटका)
दि. ११/०२/२०२४ रोजी माळशिरस शहरातील सिद्धार्थ नगर येथे पदवीधर मित्र परिवाराच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये प्रथम येऊन उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झालेले सोलापूर जिल्ह्याचे सुपुर्त्र आयु. गंगाधर गौतम होवाळे यांचा माळशिरसमध्ये नागरी सत्काराचा जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी माळशिरस पोलीस ठाण्याचे API श्री. दत्ताजीराव मोहिते हे अध्यक्ष म्हणून लाभले होते. त्यांच्या हस्ते निवड झालेले आयु. गंगाधर गौतम होवाळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या हस्ते इतर प्राविण्य प्राप्त परीक्षार्थी कु. रत्नप्रभा दीपक धाईंजे हिची सातारा जिल्ह्यामध्ये आरोग्य अधिकारी म्हणून निवड झाली. सौ. प्रज्ञा प्रमोद धाईंजे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय विभागात निवड झाली. अस्लम शेख यांची मुंबई पोलिस म्हणून निवड झाली तर आयु. योगेश पोरे यांची सहाय्यक सरकारी वकील म्हणून निवड झाली. आयु. मनोज मिलिद धाईंजे व कु. वैशाली कांबळे यांनी कायद्याची पदवी संपादन करून सिद्धार्थ नगर मधील पहिली महिला वकील होण्याचा मान संपादन केला. या सर्वांनी विविध क्षेत्रात केलेल्या या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना विशेष अश्या नागरी सत्काराने सन्मानित करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेले आयु. गंगाधर गौतम होवाळे हे नागरी सत्कारराला उत्तर देताना म्हणाले कि, हा सत्कार माझ्यासाठी सतत एक प्रेरणा देणारा स्त्रोत राहील. कोणताही महत्वाचा आर्थिक स्रोत कुटुंबाकडे नसताना, घरामध्ये कोणीही शिक्षित नसताना वेळ प्रसंगी वेठ बिगारी करून हे यश संपादन केले. या कार्यक्रमासाठी माळशिरस शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर, वकिल, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विशाल ओव्हाळ यांनी केले तर सूत्र संचालन ॲड. सुमित सावंत यांनी केले असून आभार ॲड. नितीन भोसले यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्कल अधिकारी श्री. सुशीलकुमार धाईंजे, युनियन बँकेचे मॅनेजर श्री. विशाल सोनावणे, कोर्ट कर्मचारी श्री. नागराज धाईंजे, शरद धाईंजे, ॲड. सुमित सावंत, नगरसेवक आकाश सावंत, नगर पंचायत कर्मचारी विशाल सावंत आदींनी प्रयत्न केले.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.